आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर हिंसेवर पाकिस्तानच्या संसदेत निंदाव्यंजक ठराव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानने पुन्हा नाक खुपसले आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या पाकिस्तान दौऱ्याच्या एक दिवस आधी पाक सरकारने काश्मीर हिंसाचाराच्या मुद्द्यावर नॅशनल असेंब्लीत निंदाव्यंजक ठराव मंजूर केला. काश्मीरमधील घटनेचा आम्ही निषेध करतो. संयुक्त राष्ट्राने काश्मिरमध्ये तपास पथक पाठवावे, असा आग्रह निषेध ठरावातून केला आहे. दुसरीकडे हाफिज सईद याने निदर्शने करण्याची धमकी दिली आहे. परंतु त्याचे मनसुबे कदापि यशस्वी होणार नाहीत, असे बीएसएफने मंगळवार म्हटले आहे. पाक रेंजर आणि इतर अॅथॉरिटी गृहमंत्र्यांची योग्य ती काळजी घेतीलच. त्यांच्या संरक्षणाचे पुरेसे उपाय योजून टेरर मास्टरमाइंड अतिरेकी हाफिज सईद याचे राजनाथसिंह यांचा दौरा व इस्लामाबादेतील सार्क देशांच्या गृहमंत्र्यांची बैठक उधळून टाकण्याचे मनसुबे उधळून लावतील आणि योग्य ती सावधानता बाळगतीलच, अशी आशा सीमा सुरक्षा दलाचेप्रमुख के के. शर्मा यांनी व्यक्त केली आहे. सईदच्या धमक्या पाहता जोरदार निदर्शने करून ते वाघा सीमेकडे कूच करतील.
बातम्या आणखी आहेत...