आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा-कॉलेजांत जाऊन मूली निवडायचा हुकुमशाह, अशी होती त्‍याची पद्धत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
इंटरनॅशनल डेस्‍क- हुकुमशाह मुअम्‍मर गद्दाफीने लिबियावर 40 वर्षे राज केले. 2011मध्‍ये अरब देशांत झालेल्‍या राजकीय क्रांत्‍यांमध्‍ये गद्दाफीचे आसन डळमळीत झाले. याचदरम्‍यान 20 ऑक्‍टोबरमध्‍ये एका सैन्‍य हल्‍ल्‍यात त्‍याचा अंत झाला. गद्दाफीच्‍या मृत्‍यूनंतर त्‍याच्‍या कुटुंबातील बहुतेक मारले गेले तर काहींना ट्रायलचा सामना करावा लागला. या दोन्हीपासून वाचलेल्‍या सदस्‍यांना देश सोडून जावे लागले. गद्दाफीच्‍या मृत्‍यूनंतर मानन्‍यात येत होते की, लिबियाच्‍या परिस्थितीमध्‍ये हळूहळू सुधारणा होत जाईल. मात्र तसे काहीही झाले नाही. आजही त्या देशात हिंसा आणि युद्धाचेच वातावरण आहे.

शाळेत जाऊन गद्दाफी निवडायचा मुली
गद्दाफीच्‍या रंगरंगेलीचे अनेक किस्‍से ‘गद्दाफीज हरम’ नामक पुस्‍तकात सांगितले आहेत. एनिक कोजियान यांनी हे पुस्‍तक लिहिले आहे. गद्दाफीच्‍या मृत्‍यूनंतर कोजियान यांनी त्‍याच्‍या हवसच्‍या शिकार बनलेल्‍या अनेक मुलींशी भेट घेतली. एनिक सांगतात की, 'आपली हवस शमवण्‍यासाठी गद्दाफीने सर्रासपणे शाळकरी आणि कॉलेजवयीन मुलींना आपले शिकार बनवले. त्‍यासाठी तो नियमितपणे शाळा-कॉलेजात जात असे. तेथे गेल्‍यावर तो तेथील वर्गांना भेटी देत असे. त्‍यादरम्‍यान तो त्‍याला आवडलेल्‍या मुलीच्‍या डोक्‍यावर हात ठेवत असे. हा त्‍याच्‍या सैनिकांसाठी इशारा असायचा की, या मुलीला हुकुमशाहने आपल्‍या अय्याशीसाठी पसंत केले आहे. नंतर सैनिक त्‍या मुलींना गद्दाफीपर्यंत पोहोचवायचे.  इतके सर्व खुलेआम होऊनही मुलीचे कुटुंब याबाबत तोंडही उघडू शकत नव्‍हते. असे केल्‍यास पूर्ण कुटुंबाचा मृत्‍यू निश्चित असे. गद्दाफीने त्‍याच्‍या शासनकाळात शेकडो मुलींचा अशाप्रकारे बलात्‍कार केला. त्‍यातील बहुतेकांचे वय तर जेमतेम 14 वर्षांचे होते. त्‍यावेळी लिबियामध्‍ये मुलींसाठी सुंदर असणे हा शाप मानला जायचा.'
 
मुलींना ठेवले जायचे गुप्‍त तळघरात
शाळा-कॉलेजातून किडनॅप केलेल्‍या व्‍हर्जिन मुलींना त्रिपोली युनिवर्सिटी आणि इतर ठिकाणांवरील गुप्‍त तळघरात ठेवले जायचे. बीबीसी 4च्‍या डॉक्‍युमेंट्रीमध्ये गद्दाफीच्‍या या गुप्‍त तळघरांचे फोटोही सार्वजनिक करण्‍यात आले आहेत. गद्दाफीच्‍या मृत्‍यूनंतर  अमेरिकन सैनिकांनी या तळघरांतून शेकडो मुलींना बाहेर काढले. यानंतर या मुलींवर कशाप्रकारे अत्‍याचार केले जायचे, हे जगासमोर आले.

मुलींना दाखवल्‍या जात पॉर्न सिनेमे
एनिक यांनी आपल्‍या पुस्‍तकात लिहिले आहे की, गद्दाफीसाठी आणण्‍यात आलेल्‍या मुलींना सेक्‍स स्‍लेव्‍ह बनवण्‍याचे काम केले जायचे. हे काम राजदार मुबारका नावाच्‍या एका महिलेकडे सोपवले गेले होते. मुबारका या मुलींना सजणेनटणे शिकवण्‍याबरोबरच पॉर्न सिनेमेही दाखवायची. गद्दाफीकडे जाणा-या मुलींनी त्‍याला कसे खुश करायचे याचे ट्रेनिंग ती मुलींना देत असे.  यासाठी ती त्‍यांची मानसिक तयारी करत असे. ज्‍या मुली हे सर्व करण्‍यात अपयशी ठरायच्‍या त्‍यांना अतिशय भयानक शिक्षा दिली जायची. हा हुकुमशाह सेक्‍ससाठी एवढा पागल होता की, सुंदर महिलांनाच त्‍याने आपले सेक्‍युरिटी गार्ड म्‍हणून नियुक्‍त केले होते.

मुली आणणा-यांना गद्दाफी द्यायचा बक्षिस
गद्दाफीचे काही वफादार चेले होते. त्‍यांचे काम एवढेच होते की, टँलेट हंटच्‍या नावाने शाळा-कॉलेजांतून चुणचुणीत मुलींना निवडायचे. नंतर त्‍या मुलींचे मेडीकल चेकअप केले जायचे. त्‍यांना कोणता रोग नाहीना याची तपासणी केली जायची. सर्व काही ठीक असले तर या मुलींना गद्दाफीकडे पाठवले जायचे. नंतर गद्दाफी जर या मुलीमुळे खुश झाला तर आणणा-याला तो मोठी बक्षिस देत असे.
 

पुढील स्‍लाइडवर पाहा, गद्दाफीच्‍या गुप्‍त तळघराचे काही फोटोज...

 
 
बातम्या आणखी आहेत...