आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचार प्रकरण :मुबारक यांच्यासह २ मुलांना ३ वर्षांची कैद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरो - इजिप्तच्या न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक आणि त्यांच्या दोन मुलांना भ्रष्टाचार प्रकरणात प्रत्येकी तीन वर्षांची कैद ठोठावली आहे. शिक्षेदरम्यान त्यांना पॅरोल मिळणार नाही. मुबारक यांच्यावर पुन्हा चालवण्यात आलेल्या खटल्यात ही शिक्षा झाली आहे.
मुबारक यांना गेल्या वर्षी मे महिन्यात तीन वर्षांसाठी तुरुंगवास झाला होता. त्यांनी सरकारी कमाईची रक्कम आपल्या राजवाड्याची देखभाल आणि खासगी संपत्तीवर खर्च केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात त्यांच्या दोन मुलांना चार वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती; परंतु जानेवारीत इजिप्तच्या उच्च न्यायालयात निर्णय बदलला आणि सुनावणी नव्याने घेण्याचे आदेश दिले होते. न्यायमूर्ती हसन हसनैन यांनी मुबारक िपता-पुत्रांना शिक्षा ठोठावली. मुलगा गमाल आणि अला यांना मात्र तुरुंगात जाण्याची गरज भासणार नाही. कारण त्यांनी अगोदरच तुरुंगवास भोगलेला आहे. मुबारक यांनी आपल्या शक्तीच्या बळावर इजिप्तवर ३० वर्षे शासन केले होते. त्यांना २०११ च्या अरब क्रांतीदरम्यान पदावरून हटवण्यात आले होते. मुबारक यांच्यावर त्या क्रांतीदरम्यान आंदोलकांची हत्या घडवण्यात आल्याचाही ठपका ठेवण्यात आला.