आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या राजकन्येच्या नावाबद्दल प्रचंड उत्सुकता - ओलिव्हिया, एलिझाबेथ की डायना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: राजकन्येला माध्यम प्रतिनिधींसमोर दाखवताना केट-विल्यम.
लंडन - ब्रिटनच्या शाही घराण्यात जन्मलेल्या नव्या राजकन्येच्या नावाबद्दल देशात प्रचंड उत्सुकता आहे. एकीकडे देशभर ही चर्चा सुरू असताना आई केट मिडलटन व पिता प्रिन्स विल्यम यांनी आपले कन्यारत्न रुग्णालयाबाहेर गर्दी केलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधीसमोर दाखवले. माध्यमांना आपल्या कन्यारत्नाचा चेहरा दाखवल्यानंतर तिघेही जवळच असलेल्या केन्सिग्टन पॅलेसकडे रवाना झाले.

राजकन्येचे नाव काय असेल, यावर ब्रिटनमध्ये सट्टा तेजीत आहे. जागोजाग विविध नावांवर सट्टा लावला जात असून यात "चार्लोट' हे नाव बुकींचे फेव्हरेट ठरले आहे. दुस-या क्रमांकावर अॅलिस हे नाव आहे. यानंतर ओलिव्हिया, एलिझाबेथ आणि डायना या नावांना पसंती मिळत आहे.

लंडन झाले गुलाबी
राजकन्येच्या जन्माची बातमी पसरतला लंडनमध्ये गुलाबी वातावरण आहे. टॉवर ब्रिज आणि लंडन आयसारखी प्रसिद्ध ठिकाणे गुलाबी रंगाने नटली आहेत. याशिवाय पर्यटकांची आकर्षण असलेली इतर ठिकाणेही सजली असून बीटी टाॅवरने सर्वप्रथम राजकन्येचा उत्सव सुरू केला. "इटस् ए गर्ल' असा संदेश या टॉवरवर झळकला आणि शहरात आनंदाचे उधाण आले.

बेलफास्टही सजले
उत्तर आयर्लंडमध्ये बेलफास्ट सिटीमध्येही रंगांची उधळण झाली. मात्र, ब्रिटनमध्ये रंगावरून अनेक मतप्रवाह निर्माण झाले. काहींच्या मते कन्यारत्न जन्मले म्हणजे निळ्या रंगांची उधळण व्हायला हवी. गुलाबी नव्हे.

१८२ वर्षांनंतर... : यापूर्वी ब्रिटनच्या शाही घराण्यात जन्मलेली राजकन्या होती मेरी अॅडलेड. जॉर्ज (३) यांची ही नात जर्मनीत १८२ वर्षांपूर्वी जन्मली होती. तिला फॅट मेरी म्हणूनही संबोधले जायचे. त्यानंतर राजकन्येचे बिरूद मिरवले युजीनने. (२५) प्रिन्स अँड्रयू यांच्या या कन्यारत्नाचा जन्म १९९० मध्ये झाला. आता प्रिन्स विल्यमच्या या कन्यारत्नाला राजकन्या हे बिरूद लागेल.

टॉवर ब्रिजचे ट्विट
कन्यारत्न जन्मल्याचे जाहीर होताच टॉवर ब्रिजच्या वतीने टि्वट करून आनंद साजरा करण्यात आला. शनिवारची सायंकाळ या भागात गुलाबी असेल, असे जाहीर करण्यात आले.