आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुकूमशहाला होती या गोष्टीची भीती, हे होते सीक्रेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - मागील आठवड्यात झिम्बॉब्वेमध्ये सत्तापालट झाल्यानंतर लष्कराकडून अध्यक्ष रॉबर्ट मुगाबेला हटविण्यात येणार याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. मात्र यादरम्यान लष्कराने घाईगडबडीत निर्णय न घेता समजावून सांगून पदावरून निघण्यास दबाव वाढविला. ताज्या अहवालानुसार, मुगाबेला पायउतार करण्यासाठी लष्कराने टोकाचा दबाव टाकला होता. मुगाबेच्या इशाऱ्यावर 20 हजार लोकांचा जीव घेतल्याचे रहस्य उघड करण्याची धमकी लष्कराने दिली होती. त्यानंतर मुगाबे पद सोडण्यास राजी झाले. 

 

सत्तापालट झाल्यावर लष्कराने दिली ही ऑफर

- मागील आठवड्यात लष्कराने मुगाबे यांना सर्व सुख सुविधां आणि पेन्शनसह सोडण्यास सांगितले होते. 
- मुगाबेने ही ऑफर सोडून अध्यक्षपदावर कायम राहण्याचा निर्धार केला होता. त्यानंतर लष्कराने सीक्रेट फाईल ओपन करण्याची धमकी दिली होती. 
- यामध्ये मुगाबे आणि त्यांच्या कुटूंबाविरोधात भ्रष्टाचार, हत्याकांडाचा आरोप आहेत.
- त्याशिवाय ग्रेसच्या सुरक्षेबाबतही भीती दाखविण्यात आली. त्यामुळे मुगाबे पद सोडण्यास राजी झाले.


पुढील स्लाईडवर पाहा - PHOTOS

बातम्या आणखी आहेत...