सायबेरियाची फातिमा जरफारोव्हा ने दहशतवादी संघटना आयएसआयएस जॉइन केली आहे. तिची आई शाख्ला बोचकारयोवाने याला दुजोरा दिला आहे. मुलीच्या या कृत्याने तिला धक्का बसला आहे. ती आई उद्विग्नपणे म्हणते, की \'मी मुलीला नाही, सैनाला जन्म दिला.\' 20 वर्षांची फातिमा तुर्कस्थानमार्गे सीरियात पोहोचली आहे. तिने नुकत्या झालेल्या पॅरिस हल्ल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रोपोगंडा मॅसेज पोस्ट केले होते.
आईला म्हणत होती काफिर
फातिमा 41 वर्षांची तिची आई शाख्लाला काफिर म्हणत होती. शाख्लाने एका वृत्तवाहिनीला सांगितले, \'फातिमा म्हणायची माझे भाऊ (दहशतवादी) येतील आणि तुझ्या सारख्या काफिरांना मृत्यूदंड देतील.\' शाख्ला यांच्या म्हणण्यानुसार, फातिमाने तिला म्हटले होते की दहशतवादी येतील आणि तुझे शीर कलम करतील तेव्हा मी जराही घाबरणार नाही.
पळून जाऊ नये म्हणून साखळदंडाने ठेवले होते बांधून
मुलगी कधीही काहीही करु शकते याची तिच्या आईला भीती होती, त्यामुळे ती मुलीला फार जपत होती. शाख्ला यांच्या म्हणण्यानुसार, फातिमा घरसोडून सीरियात पळून जाऊ नये म्हणून त्यांनी साखळंदडाने तिला बांधून ठेवले होते. मात्र अखेर ती पळून जाण्यात यशस्वी झाली.
अशी वाढली आईची चिंता
जेव्हा अब्दुल्ला नावाच्या व्यक्तीची पोलिसांनी आयएसआयएसचा रिक्रूटर अशी ओळख सांगितली तेव्हा शाख्ला यांच्या पायाखालून जमीन सरकली. शाख्लाचे म्हणणे आहे, की अब्दुल्ला त्यांच्या मुलीसोबत लग्न करु इच्छित होता. त्या म्हणाल्या, \'माझी मुलगी त्याच्यासोबतच राहात आहे. तिला देखील माहित आहे की दहशतवादी तिला जिवंत सोडणार नाही, बुलेटनेच तिच्या आयुष्याचा शेवट होणार आहे.\'
कायम कयामतच्या गोष्टी
फातिमा एका मुस्लिम कुटुंबात वाढलेली आहे. शाख्ला म्हणाल्या, \'तिचा ड्रेसिंग सेन्स फार चांगला होता. मात्र ब्रेनवॉश झाल्यानंतर तिने हिजाब घालण्यास सुरुवात केली. तेव्हा पासून ती कायम कयामतच्या गोष्टी करत होती.\'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शाळकरी वयात किती निरागस होती फातिमा