आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलच्या 11 खेळाडूंची हत्या, मग 'मोसाद'ने असा घेतला होता बदला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपहरण करण्यात आलेले इस्रायली खेळाडू... - Divya Marathi
अपहरण करण्यात आलेले इस्रायली खेळाडू...
इंटरनॅशनल डेस्क - जर्मनीच्या म्युनिक शहरात 1972 मध्ये ऑलिम्पिक आयोजित करण्यात आले होते. यात जगभरातील खेळाडू सहभागी झाले होते. त्यापैकी एक टीम इस्रायलची होती. 5 सप्टेंबर 1972 दिवस त्या टीमसाठी क्रीडा इतिहासातील सर्वात दयनीय क्षण ठरला. म्युनिकच्या ज्या हॉस्टेलवर इस्रायलचे 11 खेळाडू थांबले होते त्यामध्ये 8 दहशतवादी घुसले. त्यांनी सर्वच खेळाडूंना वेठीस धरले. 
 
 
नेमके काय घडले होते?
- सर्वच दहशतवाद्यांनी ट्रॅकसूट घातला होता. हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनी त्यांना खेळाडू समजून प्रवेश दिला. सगळेच दहशतवादी पीएलओ अर्थात पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायजेशनचे सदस्य होते. 
- हॉस्टेलमध्ये दाखल होताच सशस्त्र दहशतवाद्यांनी सर्वच खोल्यांची झळती घेण्यास सुरुवात केली. तसेच इस्रायली खेळाडू सापडताच त्यांना वेठीस धरले. 
- काही तासांतच हे वृत्त जगभरात पसरले, की काही पॅलेस्टीनी दहशतवाद्यांनी इस्रायली खेळाडूंचे अपहरण केले आहे.  
- दहशतवाद्यांनी त्यांच्या सुटकेच्या बदल्यात इस्रायली तुरुंगांमध्ये बंद 234 पॅलेस्टीनींच्या सुटकेची मागणी केली. मात्र, इस्रालयने तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. 
- यानंतर दहशतवाद्यांनी 2 इस्रायली खेळाडूंना ठार मारून त्यांचे मृतदेह हॉस्टेलच्या बाहेर फेकून दिले. मागण्या मान्य नाही केल्यास उर्वरीत खेळाडूंचेही असेच हाल करण्याची धमकी दिली. 
 

विमानतळावरील तो थरार
- दहशतवाद्यांचे काहीच मान्य करण्यास नकार देणाऱ्या इस्रायलने जर्मन सरकारसोबत एक संयुक्त मोहिम राबवण्याचे आवाहन केले. मात्र, जर्मनीने त्यास नकार दिला. 
- इस्रायल आपल्या मागण्या मान्य करणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर दहशतवाद्यांनी तेथून स्वतःला सुखरूप बाहेर येऊ देण्याची मागणी पुढे केली. ते आपल्यासोबत उर्वरीत 9 इस्रायलींना सुद्धा घेऊन जाणार होते. 
- इस्रायलने दहशतवाद्यांची ही मागणी मान्य केली. प्रत्यक्षात, दहशतवादी पळून जाण्यासाठी विमानतळावर येतील तेव्हाच त्यांना ठार मारण्यासाठी इस्रायलने शार्प शूटर तैनात केले होते. 
- योजनेप्रमाणे, दहशतवाद्यांसाठी बस पाठवण्यात आली आणि त्यांना विमानतळावर नेण्यात आले. विमानतळावर आंधारात आणि दूरवर शार्प शूटर निशाणा धरून ठेवण्यात आले होते. 
- विमानतळावर दहशतवादी येताच शार्पशूटर्सने दहशतवाद्यांवर गोळीबार सुरू केला. मात्र, त्याचवेळी दहशतवाद्यांनी सुद्धा आपल्यासोबत असलेल्या इस्रायली खेळाडूंवर बेछूट गोळ्या झाडल्या. या घटनेत दहशतवाद्यांसह सर्व खेळाडू सुद्धा ठार झाले. 
 

यानंतर मोसादने काय केले?
- खेळाडूंच्या हत्येचा आरोप 2 दहशतवादी संघटनांवर लावण्यात आला होता. हा कट रचण्यात 11 दहशतावद्यांचा हात होता, त्यांची नावे सुद्धा समोर आली. ते सगळेच विविध देशांमध्ये लपले होते. 
- इस्रायलने या सर्वच दहशतवाद्यांना ठार मारण्याचा संकल्प घेतला होता. तसेच सरकारने ही जबाबदारी जगातील सर्वात कार्यक्षम आणि नावाजलेली गुप्तचर संस्था मोसादला दिली. मोसादने या मिशनला 'Wrath OF God' (देवाचा प्रकोप) असे नाव दिले.
- मोसादच्या टीमने एकानंतर एक सर्वांना शोधून ठार मारण्यास सुरुवात केली. ते सगळेच विविध देशांमध्ये लपले होते. तरीही मोसादने त्यांची ठिकाणे शोधून त्यांना ठिकाणांसह नेस्तनाबूत केले. 
- या घटनेच्या 2 दिवसांनंतर इस्रायलच्या लष्कराने सीरिया आणि लेबनानमध्ये पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायजेशनच्या 10 ठिकाणांवर बॉम्बगोळे टाकले. तसेच सामान्य नागरिक आणि दहशतवाद्यांसह एकूण 200 जणांना ठार मारले होते. 
- विशेष म्हणजे, इस्रायलची हीच गुप्तचर संस्था मोसाद अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे संरक्षण करणाऱ्या गार्ड्सला सुद्धा ट्रेनिंग देते.
बातम्या आणखी आहेत...