आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CCTV : आरोपीने स्वतःच्यात वकिलावर झाडल्या गोळ्या, मग केली आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्जेंटिनीच्या एका रेस्तरॉमध्ये आरोपीने आपल्याच वकिलाची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे यानंतर त्याने स्वतःदेखिल आत्महत्या केली. आरोपीवर दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होता. ही घटना गेल्या बुधवारी कॉरिएंटेस शहरात घडलेली आहे. सीसीटिव्हीमध्ये या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार झाला.

अशी झाली हत्या...
सकाळी साडे सात वाजता प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर एर्नेस्टो गोन्जालेज जेव्हा एका रेस्तरॉमध्ये नाश्ता करत होते त्याचवेळी त्यांचा अशील त्या ठिकाणी होता. तो एवढा रागात होता की, त्याने थेट वकिलावर गोळी झाडली. कार्लोस मर्टिनीज असे या आरोपीचे नाव आहे. वकिलाला गोळी मारल्यानंतर कार्लोसने स्वतःलाही गोली मारुन घेतली. मात्र या हत्येमागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

रागाता होता आरोपी...
अशिलाने बंदुकीतील सहा गोळ्या वकिलावर झाडल्या. त्यावरूनच तो किती रागात असेल याचा अंदाज लावता येऊ शकेल. त्यानंतर त्याने स्वतःच्या डोक्यातही गोळी मारली. पहिली गोळी लागताच वकील जमिनीवर कोसळला. त्यानंतर कार्लोसने त्याच्या जवळ जाऊन आणखी पाच गोळ्या त्याच्यावर झाडल्या. यादरम्यान रेस्तरॉमध्ये चांगलीच गर्दी होती. गोळीचा आवाज येताच अनेक लोक सैरावैरा धावू लागले तर काही जमिनीवर झोपले.