आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Muslim Woman Passenger Was Refused To Serve Unopened Diat Coke

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुस्लिम आहे म्हणून, विमान प्रवासात महिलेला डायट कोकचे बंद कॅन नाकारले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युयॉर्क- युनायटेड एअरलाईन्सच्या विमानाने शिकागो येथून वॉशिंग्टनला जात असताना एका मुस्लिम महिला प्रवाशाने डायट कोकचे बंद कॅन मागितले. पण संबंधित महिलेला बंद कॅन देण्यात आले नाही. इतर प्रवाशांना मात्र असे बंद कॅन देण्यात आले. केवळ मुस्लिम असल्याने डायट कोकचे बंद कॅन या महिलेला देण्यात आले नाही, असे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे जोरदार खळबळ उडाली आहे.
ताहेरा अहमद असे या मुस्लिम महिला प्रवाशाचे नाव आहे. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या इंटरफेथ एन्गेजमेंटच्या त्या संचालक आहेत. इस्रायल आणि पॅलेस्टाईन येथील तरुण वर्गात संवाद वाढावा यासाठी आयोजित करण्यात आलेल्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी ताहेरा वॉशिंग्टनला जात होत्या.
प्रकृतीच्या कारणामुळे ताहेरा यांनी डायट कोकचे बंद कॅन मागितले होते. त्यावर फ्लाईट अटेंडंटने सांगितले, की बरं, मला माफ करा. मी तुम्हाला बंद कॅन देऊ शकत नाही. तुम्हाला डायट कोक देता येणार नाही.
पुढील स्लाईडवर वाचा, समोरच्या प्रवाशाला दिले होते बिअरचे बंद कॅन....