आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslim Women Performing In Burkha For Music Band

लोकांची पर्वा न करता बुरख्यामध्येच म्युझिक बँडबरोबर करते परफॉर्म

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - परफॉर्म करणारी गिसेले मॅरी. - Divya Marathi
फोटो - परफॉर्म करणारी गिसेले मॅरी.
साओ पावलो - बुरखा परिधान करून गिटार हातत घेऊन परफॉर्म करणारी ही महिला सध्या तिचया अल्बमच्या कामात व्यस्त आहे. ब्राझीलच्या साओ पावलोची राहणारी 42 वर्षीय गिसेले मॅरी एका जर्मन कैथलिक कुटुंबातील आहे. पण 2009 मध्ये तिने इस्लाम धर्म स्वीकारला. त्यानंतरही तिने संगीत क्षेत्रात प्रवास सुरू ठवले. ती रोज सहा तास संगीत शिकते. या माध्यमातून गिसेले जुन्या परंपरा मोडीत काढू इच्छिते.

गिसेले हे प्रसिद्ध गिटारिस्ट रँडी रोड्सची फॅन आहे. तसेच अनेक वर्षांपासून ती भावाच्या बँडमध्ये काम करत होती. पण काही मतभेदांमुळे त्यांनी भावाचा बँड सोडला. आता त्या नव्या बँडबरोबर काम करत आहेत. त्यांनी बँडचे नाव सांगायला मात्र नकार दिला आहे. त्यांचा बँड सध्या त्यांच्या पहिल्या अल्बमवर काम करत आहे. पुढील वर्षापर्यंत तो अल्बम लाँच होणार आहे. गिसेले सांगते की, बुरखा परिधान केलेल्या एका मुस्लीम महिलेला गिटार वाजवताना पाहणे लोकांसाठी आश्चर्यचकित करण्यासारखे असते. पण त्यांच्यामुळे इतरही लोक परंपरा मोडून संगीतक्षेत्राशी जोडले जातील असे त्यांचे मत आहे.

त्या म्हणाल्या, मी बुरखा परिधान केला आहे आणि लोक मला पाहत आहेत याची काळजी मी करत बसत नाही. मला तर असे वाटते की लोकांनी हे लक्षात घ्यावे की माझा धर्म मुस्लीम आणि पेशा संगीत आहे. या दोन्ही गोष्टी माझ्या आयुष्यासाठी खास आहेत. माझे सर्व लक्ष संगीत क्षेत्रावर केंद्रीत केलेले आहे आणि माझ्या मुस्लीम असल्याचा त्यावर काहीही परिणाम होत नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बँडसह गिसेले मॅरीचे आणकी काही PHOTOS