आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्यानमार: आंग सान सू की यांचे ड्रायव्हर राहिलेले क्यॉ होणार देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिन क्यॉ संसदेत जाताना. आज त्यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड होणार आहे. - Divya Marathi
तिन क्यॉ संसदेत जाताना. आज त्यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड होणार आहे.
नेप्यिदौ (म्यानमार) - तिन क्यॉ म्यानमारचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. आज (मंगळवार) त्याची घोषणा होणार आहे. क्यॉ देशाच्या सर्वात मोठ्या नेत्या आंग सान सू की यांचे ड्रायव्हर राहिलेले आहेत. गेल्या आठवड्यात आंग यांचा पक्ष नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीने (एनएलडी) त्यांना राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित केले होते.
आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला केले पराभूत
- म्यानमानर संसदेत तिन क्यॉ यांना 652 पैकी 360 मते मिळाली होती. त्यांनी त्यांच्याच पक्षाच्या एनएलडीच्या उमेदवाराला पराभूत केले होते.
- लष्कराकडून विद्यमान राष्ट्राध्यक्ष थेन सेन यांचे नजीकचे सहकारी म्यिंट श्वे यांना 200 मते मिळाली. तर, एनएनडी उमेदवार हेन्री वान थियो यांना फक्त 79 मते मिळाली.
- पराभूत झालेले दोन्ही उमेदवार फर्स्ट व्हाइस प्रेसिडेंट आणि सेकंड व्हाइस प्रेसिडेंट होतील.
- 50 वर्षांत प्रथमच देशात निवडणूकीच्या माध्यमातून राष्ट्राध्यक्षाची निवड होत आहे. याआधी लष्करी राजवट होती.

कोण आहे तिन क्यॉ
- 69 वर्षांचे तिन क्यॉ एनएलडी पक्षाच्या प्रमुख आंग सान सू की यांचे सल्लागार आहेत. ते आंग सान यांचे ड्रायव्हर देखिल राहिलेले आहेत. तिन क्यॉ शाळकरी वयापासून आंग सान यांच्यासोबत आहेत.
- तिन क्यॉ हे आंग सान यांच्यापेक्षा एका वर्षाने लहान आहेत. 1962 मध्ये यंगून विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली होती. त्यानंतर ऑक्सफोर्डला गेले होते.
- त्यांचे वडील मिन थू वून लेखक होते. 1990 मध्ये ते एनएलडीकडून विजयी झाले होते.
- सध्या तिन क्यॉ एक सेवाभावी संस्थाचे संचालक आहेत.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, आंग सान सू की का होणार नाही राष्ट्राध्यक्ष
बातम्या आणखी आहेत...