आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशातून आला आगीचा गोळा; लोक म्हणाले, स्पेसशिप आले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगभरात अशा काही घटना घडतात ज्याचे उत्तर कुणाकडेही नसते. लोकांनी अशा गोष्टी कधीही पाहिलेल्या नसतात. त्यामुळे, अनेकांना भिती देखील वाटते. अशीच एक घटना जर्मनीत घडली आहे. जर्मनीत एका ठिकाणी लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात आकाशातील अजब घटना कैद केली. यात आकाशातून मोठा आगीचा गोळा हळुवार गतीने जमीनीच्या दिशेने येत होता. जमीनीजवळ येत असताना त्याची स्पीड वाढत होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर हजारो लोक शेअर करत आहेत. ही घटना याच आठवड्याच्या सुरुवातीला घडली आहे.

 

प्रसिद्ध इंग्रजी दैनिक डेली मेलच्या वृत्तानुसार, हे फायरबॉल (आगीचा गोळा) इटली आणि स्वित्झरलंडमध्ये देखील पाहण्यात आला आहे. तेथे देखील लोक या रहस्यमयी घटनेचा व्हिडिओ शेअर करत आहेत. केवळ सामान्य लोकच नव्हे, तर एका शहरातील अग्निशमन विभागाने सुद्धा हा व्हिडिओ शेअर केला. आकाशातून खाली पडताना या गोळ्याचा रंग लाल, निळा आणि हिरवा असा बदलत होता. या घटनेच्या 1150 प्रत्यक्षदर्शींची अधिकृत नोंद झाली आहे. काही लोक या आगीच्या गोळ्याला उल्कापात म्हणत आहेत. मात्र, त्याचे काहीही पुरावे सापडलेले नाहीत. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज, व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...