आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mystery Solved Scientist Found Proof Of Water On Mars

मंगळाबाबत NASA चा मोठा खुलासा, ग्रहावर पाणी असल्याचा केला दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नासाने मंगळाच्या पृष्ठबागाचा हा फोटो जारी केला आहे. या ग्रहावर द्रवरुप पाणी असल्याचे त्यात म्हटले आहे. - Divya Marathi
नासाने मंगळाच्या पृष्ठबागाचा हा फोटो जारी केला आहे. या ग्रहावर द्रवरुप पाणी असल्याचे त्यात म्हटले आहे.
वॉशिंग्टन - अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने मंगळावर पाणी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नासाच्या नव्या माहितीनुसार मंगळाच्या पृष्ठभागावर वाहते पाणी उपलब्ध असल्याचे पुरावे मिळाले आहेत. सॅटेलाइटद्वारे मिळालेल्या डाटावरून हे लक्षात येते की, उंच भागांवर दिसणाऱ्या या डार्क रेषा पाणी आणि मीठामुळे तयार झालेल्या आहेत.

सॉल्ट पॅरोक्लोरेटमुळे
मार्स रिकानाससेंस ऑर्बिटर स्पेसक्राफ्टला मंगळावर लिक्विड फॉर्ममध्ये सॉल्ट पॅरोक्लोट असल्याचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळेच मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग आणि उतारावर रेषा दिसून आल्या आहेत. सॉल्ट पॅरोक्लोरेट मंगळावर द्रवरुपात उपलब्ध आहे. त्याचमुळे या रेषा तयार झाल्या आहेत. पॅरोक्लोरेट नावाचे हे मीठ 70 अंश तापमानातही पाणी घोटू देत नाही.

लुजेंद्रच्या मतावर शिक्कामोर्तब
मंगळावर पाणी मिळण्याच्या शक्यतेने जोर पकडण्याचे कारण म्हणजे नासा या घोषणेमध्ये लुजेंद्र ओझा नावाच्या एका पीएचडी स्टुडंटचा समावेश असल्याचे म्हटले होते. 2011 मध्ये पदवी मिळवलेल्या 21 वर्षीय लुजेंद्रने मंगळावर पाणी असल्याची लक्षणे शोधली आहेत. शास्त्रज्ञांना मंगळाच्या ध्रुवांवर गोठलेले पाणी असल्याची माहिती यापूर्वीपासूनच होती.

पुढील स्लाइड्वर पाहा, संबंधित PHOTOS...