न्यूयॉर्क - आयएसआयएसच्या तावडीत जवळपास तीन महिने सेक्स स्लेव्ह राहिलेली यजीदी मुलगी नादिया मुरादला संयुक्त राष्ट्राने (यूएन) गुडविल अॅम्बेसेडर (सदिच्छादूत) नियुक्त केले आहे. नादियाच्या नावाची औपचारिक घोषणा शुक्रवारी झाली. यूएन म्हणाले, नादिया आमच्यासोबत ह्युमन ट्रॅफिकिंगविरोधात लढा देईल. यासंबंधी लोकांमध्ये जागृती करेल.
कोण आहे नादिया, काय-काय सहन केले तिने
- 2014 मध्ये नादिया 21 वर्षांची होती तेव्हा आयएसआयएस दहशतवाद्यांनी तिच्या गावावर हल्ला करुन तिला उचलून नेले.
- इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी तिला रो प्राताडित केले. तिच्यावर बलात्कार होत होते. जवळपास तीन महिने तिला बंदिवान बनवून ठेवले होते.
- मागीलवर्षी डिसेंबरमध्ये दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर नादियाने यूएन सेक्यूरिटी कॉन्सिलसमोर आपबीती सांगितली होती.
काय सांगितले होते नादियाने
- नादियाने सांगितले होते, 'माझ्यासमोर माझा भाऊ आणि वडिलांची हत्या केली गेली होती. त्यानंतर आयएसआयएस दहशतवाद्यांनी आधी मला मोसुल येथे नेले होते.'
- 'संपूर्ण रस्त्याने ते माझ्यासोबत वाईट वागत होते. मी रडत, ओरडत दयाचे भीक मागत होते, त्या बदल्यात त्यांनी मला बेदम मारले.'
- 'काही दिवसानंतर त्यांनी मला एका दहशतवाद्याच्या हवाली केले. तो माझ्यावर रोज बलात्कार करत होता. मी पळून जाण्याचा प्रयत्न केला तर गार्डने मला पकडले.'
- 'त्या रात्री मला जनावरांसारखे मारले आणि कपडे उतरवून त्या गार्ड्सच्या हवाली केले. त्या रात्रीचे अत्याचार असाह्य होते. मी बेशुद्ध होईपर्यंत ते रेप करत होते.'
पुढील स्लाइडमध्ये, अनेक सदस्यांचे डोळे भरुन आले