आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलची नाेकरी साेडून करताहेत शेती, कटारूंंच्या संकल्पनेतून साकारले होते गुगल टूल्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया - ही गोष्ट आहे, आंध्र प्रदेशच्या नगा कटारू यांची. त्यांनी गुगल अलर्टची संकल्पना मांडली होती, तेव्हा वरिष्ठांनी ती चक्क नाकारली. परंतु कटारूंंना पूर्ण आत्मविश्वास होता. त्यांनी ही संकल्पना गुगलच्या संस्थापकांसमोर मांडली. त्यांना ती खूपच आवडली आणि २००३ मध्ये गुगल अलर्ट सर्वांसमोर आले. एवढे करून कटारू थांबले नाहीत, आठ वर्षे नोकरी केल्यानंतर कामात मन रमेना म्हणून त्यांनी चक्क गुगलला रामराम ठोकला. सरळ चित्रपटसृष्टीचा रस्ता धरला. तेथे काम करत असताना गावाकडचे जुने दिवस आठवले आणि त्यांनी कॅलिफोर्नियात चक्क बदाम आणि जर्दाळूची शेती सुरू केली.

आता त्यांना वर्षाकाठी १६ ते १७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते आहे. कटारू २००० मध्ये गुगलला अभियंता म्हणून रुजू झाले. तेव्हा या कंपनीत केवळ ११० जण होते. कटारू जेव्हा आपली अलर्टची संकल्पना घेऊन गुगलचे संस्थापक सर्गेई ब्रिन आणि लॅरी पेज यांच्या कडे गेले तेव्हा या दोघांनी ही संकल्पना पूर्ण पडताळून पाहिली. नंतर ती सर्वांसमोर सादर केली. सध्या हे गुगलचे सर्वाधिक उपयुक्त टूल्सपैकी एक आहे. गुगल अलर्टसाठी कटारू यांच्या नावावर तीन पेटंटदेखील आहेत. कटारूंचे बालपण आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गंपालागुडम गावात गेले. नंतर आयआयटी करून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली.
नवे करण्याची ईर्षा...
नवे काही करण्याच्या ईर्षेतून कटारूंनी अभियंत्याची नोकरी सोडली. माहितीपट, लघूपट केले. रंगभूमी आणि चित्रपट करत असताना त्यांना गावातील आठवणी खुणावू लागल्या. त्यांनी कॅलिफोर्नियात ३२० एकर शेती खरेदी केली व शेती करू लागले. आज कॅलिफोर्नियाचे बदाम जगभर प्रसिध्द आहेत.