आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagasaki Attack, Over 70 Years Latest Attack Wounds

७० वर्षे उलटूनही हल्ल्याच्या जखमा ताज्याच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो- ७० वर्षांपूर्वी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा व नागासाकी शहरावर अणुबाॅम्ब टाकले होते. हा अण्वस्त्राचा पहिला प्रयोग होता. एका झटक्यात सुमारे दीड लाख लोकांचा मृत्यू होईल, असा अंदाज त्या वेळी अमेरिकेलाही नसावा. जगातील सर्वात क्रूर हल्ला लष्करी तळाऐवजी नागरी ठिकाणांवर करण्यात आला होता. सुमारे २० हजार व्यक्ती या महाविनाशाचे साक्षीदार आहेत. त्यांना ‘हिबाकुसिया’ म्हटले जाते. त्यापैकी एक आहेत ८६ वर्षीय सुमितेरू तानिगुची. ते
अण्वस्त्र विरोधी मोहीम चालवत आहेत. जगाला पुन्हा कधीही असा हल्ला पाहण्याची वेळ येणार नाही, अशी त्यांना आशा वाटते.

‘शरीरावर कपडे नव्हे, मांसाचे तुकडे लटकतायत हे तीन दिवसांपर्यंत लक्षातच नाही आले ’
मी तेव्हा १६ वर्षांचा होताे. पोस्टमनचे काम करत होतो. सायकलवरून एके ठिकाणी जात होतो. अचानक जोरदार स्फोट झाला. स्फोटात मी सायकलसह खूप लांब फेकला गेलो. अनेक तासांनंतर शुद्धीवर आलो. पाहिले तर भिंतींवर मांसाचे तुकडे चिकटलेले होते. जखमा झाल्याची जाणीवही नव्हती. तीन दिवस भटकत होतो. माझ्या अंगावर फाटका कपडा असावा, असे मला वाटत होते. नंतर लक्षात आले, हा कपडा म्हणजेच माझी त्वचा आहे. त्यादरम्यान सुरक्षा यंत्रणेने मला ताब्यात घेतले. उपचाराच्या काळात २१ महिने पोटावर पडून राहावे लागले होते. ईश्वराने अशा वेदना कोणाच्याही वाट्याला येऊ देऊ नयेत.
रोज लावावी लागते क्रीम
तानिगुची डावा हात उचलू शकत नाहीत. फासळ्याही राहिल्या नाहीत. शरीरात घुसलेले तुकडे अद्यापही बाहेर काढता आलेले नाहीत. वेदना कमी करण्यासाठी दररोज शरीरावर क्रीम लावावी लागते. श्वासदेखील नीटपणे घेता येत नाही. काम करणेदेखील कठीण जाते.