आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेम-गेम: नावे सारखीच, भलत्यालाच रॉयल्टी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - नावात काय आहे, असे म्हटले जाते. परंतु बहुदा नावातच सर्व काही असावे. तसे नसते तर एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या समान नावाच्या व्यक्तीला २० वर्षांपासून हजारो रुपयांचे रॉयल्टीचे चेक मिळाले नसते. तेदेखील त्याच्या जन्माच्या पाच वर्षे अगोदर बंद पडलेल्या टीव्ही मालिकांसाठी.
४१ वर्षीय नील फिट्जपॅट्रिकला गेल्या वीस वर्षांपासून हजारो पाैंडाचे रॉयल्टीचे धनादेश मिळू लागले आहेत. बीबीसीकडून शेरलॉक होम्स आणि ब्लू कार्बन्कलमधील अभिनयासाठी धनादेश मिळू लागले आहेत. वास्तविक धनादेश ऑस्ट्रेलियाच्या अभिनेत्याला देणे अपेक्षित होते. त्यांचे नाव नील फिट्जपॅट्रिक असे होते. सारखेच नाव असल्याने ही चूक वीस वर्षे होत राहिली.
स्कारबोरोमध्ये राहणा-या नीलने बीबीसीला ही चूक लक्षात आणून देण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु त्यानंतरही धनादेश येणे थांबले नाही. माझ्यासाठी ही गोष्ट अतिशय आनंदाची होती. नीलने रेडिआेवरील वेल्श भाषेतील कार्यक्रमात काम केले होते. परंतु शेरलॉक होम्सशी तर त्याचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. या महत्त्वाच्या नाटकात काम करण्यासाठी मूळ अभिनेत्याला २० वर्षे रॉयल्टीचे चेक दिले जात आहेत.

नीलनुसार, एकही धनादेश मी वठवला नाही. कारण हे धनादेश मुळी माझ्यासाठी नव्हतेच. अलीकडेच नीलला १७० पौंडाचा (११ हजार ९०० रुपये) चेक मिळाला. वीस वर्षांच्या काळात २ हजारांहून अधिक पौंडाचे धनादेश (१.४० लाख रुपये) मिळाले आहेत. नील अभिनेता नाही. परंतु गीत लेखनाची कला मात्र त्यांच्याकडे आहे. अलीकडेच त्यांनी सामाजिक कार्यासाठी कॉल्ड अपार्ट हे गाणे लिहिले. त्यामाध्यमातून त्यांना आतापर्यंत १३ हजार पाैंड (९ लाख रुपये) मिळाले. परंतु नीलचे लक्ष्य २५ हजार पाैंड (१७.५० लाख रुपये) आहे. कर्करोग संशोधनासाठी ही रक्कम देण्याची त्याची इच्छा आहे. या सर्व प्रकरणात लेखा विभागाची नेमकी चूक काय झाली, याचा कसून शोध आम्ही घेत आहोत, असे बीबीसीच्या वर्ल्ड वाइडच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.