आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशहितासाठी कठोर निर्णय घेतच राहणार; नरेंद्र मोदींचा म्यानमारमध्ये भारतीयांशी संवाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाय पेइ टाव (म्यानमार)-देशातील नोटबंदी व जीएसटीच्या निर्णयांचे कौतुक करतानाच भ्रष्टाचार व काळ्या पैशांतून देशाला मुक्त करण्यासाठी सरकारने अनेक मोठे आणि कठोर निर्णय घेतले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘नव भारत’ बनवण्याचा संकल्प देखील सरकारने केला आहे. त्यासाठी छोटे-मोठे बदल नव्हे तर संपूर्ण परिवर्तन आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. व्यापारातील पारदर्शकतेसाठी जीएसटीचा उल्लेख करून मोदी म्हणाले, साठ वर्षांत न झालेली कामे केवळ सहा वर्षांत झाली आहेत, असे मोदी म्हणाले. बुधवारी अनिवासी भारतीय समुदायाशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.  
 
रोहिंग्यांच्या पलायनावर चिंता 
म्यानमार दौऱ्यात त्यांच्या उपस्थितीत रखाइन प्रांतात रोहिंग्या मुस्लिम-सुरक्षा दलातील हिंसाचारानंतर सव्वा लाख रोहिंग्यांनी बांगलादेशात पलायन केले. त्यावरही मोदींनी चिंता व्यक्त करत चर्चेतून तोडगा काढण्याचे आवाहन केले. भारताच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने पहिल्या आंतरराष्ट्रीय रस्ते प्रकल्पाची म्यानमारमध्ये उभारणी करण्यात येणार आहे. 
 
४० कैद्यांची सुटका करणार
 स्यू की यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मोदी यांनी भारताच्या विविध तुरुंगांत असलेल्या म्यानमारच्या ४० कैद्यांची सुटका केली जाईल, अशी घोषणा केली. हे नागरिक लवकरच आपल्या कुटुंबीयांची भेट घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. उभय देशांत नौदल सुरक्षेसह विविध क्षेत्रांत एकूण ११ सहमती करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. म्यानमारच्या नागरिकांना भारत भेटीसाठी मोफत व्हिसा मिळणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...