आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO: गुडघ्यावर बसून मोदींनी घेतले खालसा दिवान गुरूद्वाऱ्यात दर्शन, विदेश दौऱ्याचा शेवटचा दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वँकूवर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज तीन दिवसीय विदेश दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. फ्रान्स आणि जर्मनीनंतर पंतप्रधान मोदी कॅनडा, टोरांटो आणि त्यानंतर वँकूवर येथे पोहोचले. मोदींनी आपल्या वेंकुवर दोऱ्याची सुरूवात ऐतिहासिक खासला दिवान गुरूद्वाऱ्यात दर्शन घेऊन केली. यानंतर मोदी लक्ष्मीनारायण मंदिरात पोहोचले.
कॅनाडाच्या शेवटच्या दिवशी वँकूवर येथील लक्ष्मीनारायण मंदिरात पोहोचलेल्या मोदींनी सांगितले की, जीवनात संतुलन ठेवण्यासाठी योग हे फार प्रभावी माध्यम आहे. तसेच कॅनाडातील भारतीयांना आवाहन केले आहे की, त्यांनी योगला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे यावे. त्यामुळे मोदींचा हा दौरा एकीकडे कुटनिती दर्शक असला तर, दुसरीकडे त्याची सांस्कृतिक बाजू दिसत आहे.
वँकूवरमध्ये आपल्या दौऱ्याची सुरूवात करण्याआधी मोदी खालसा दिवान गुरूव्द्वाऱ्यात गेले. शीख समाजामध्ये या गुरुव्दाऱ्याचे फार महत्त्व आहे. शिख समुदाय कॅनडात राहाणारा सर्वात मोठा भारतीय समाज आहे. तसेच राजकीय क्षेत्रात हा समाज सक्रीय आहे आणि त्यांचा मोठा प्रभावसुध्दा आहे. एकीकडे दहशतवादाला संपवण्यासाठी मोदींनी टोरांटो येथील कनिष्क स्मारकाला भेट देणे योग्य समजले, तर दूसरीकडे वँकूवर येथील गुरुव्दाऱ्यालाही भेट देण्यास महत्त्वल दिले.
पुढील स्लाईडवर पाहा, मोदींची या भेटी दरम्यानची छायाचित्रे...