आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi In Singapore Modi Lee Hold Bilateral Talks

सिंगापूर: मोदी म्हणाले, आमचे सरकार आल्यानंतर एफडीआयमध्‍ये 40 टक्क्यांनी वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंगापूरमधील भारतीय समुदायाला आज (मंगळवार) संबोधिले. त्यांनी सिंगापूरला लिटिल इंडिया असे म्हटले. आज जग विश्‍वासाने भारताकडे पाहात आहे. हे केवळ मोदींमुळे नव्हे, तर तुमच्यासारखे लोक भारताच्या बाहेर राहतात त्यामुळे, असे मोदी म्हणाले. एफडीआयची आवश्‍यकता फर्स्ट डेव्हलप इंडियासाठी हवी आहे. एनडीएचे सरकार आल्यानंतर एफडीआयात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे,असे मोदी यांनी सांगितले.
भाषणातील महत्त्वाचे मुद्दे ;
1. भारत विकासाचा मंत्र घेऊन पुढील वाटचाल करील. पंतप्रधान मोदी म्हणाले, सिध्‍दी आणि प्रसिध्‍दीत मोठा फरक आहे. काही काळ प्रसिध्‍द जागा बनवते. मात्र बदल आणू शकत नाही.
2. जेव्हा भारतीय येमेन, लीबिया आणि इराकमध्‍ये संकटात सापडली होती तेव्हा जगाने आम्हाला मदत केली. यामुळे जगाबरोबर आमचे संबं‍ध जिवंत असले पाहिजे. औपचारिक संबंधातून काही मिळत नाही.