आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएम मोदींनी म्यानमारमध्ये काली मंदिरात केली पूजा, बहादुर शाह जफर मजारलाही दिली भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काली मंदिरात पूजा करताना पीएम मोदी... - Divya Marathi
काली मंदिरात पूजा करताना पीएम मोदी...
यंगून - पीएम नरेंद्र मोदींचा 3 दिवसीय म्यानमार दौऱ्याचा समारोप झाला आहे. त्यांनी गुरुवारी येथील 2500 वर्षे जुन्या श्वेदागॉन पैगोडाचे दर्शन घेतले. तसेच बहादुर शाह जफरच्या मजारला सुद्धा भेट दिली. तत्पूर्वी मोदींनी काली मंदिरात जाऊन पूजा देखील केली. यानंतर आंग सान म्युजियमला गेले. यावेळी मोदींसोबत स्टेट काउंसलर आंग सान सू की देखील होत्या. तर बुधवांनी मोदींनी आनंद मंदिरचा देखील दौरा केला. 
 
 
इंग्रजांनी केले होते बहादूर शाहांना कैद
- बहादुर शाह जफर यांचा मृत्यू यंगून येथे झाला होता. मोदींनी बहादुर शाह यांच्या मजारवर जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पित केली. म्यानमारमध्ये 1857 च्या उठावाचे नेते आणि शेवटचे मुगल बादशहा जफर यांना कैद करून येथे ठेवण्यात आले होते. याच ठिकाणी त्यांचा दफनविधी पार पडला. इंग्रजांनी त्यावेळी कित्येक स्वातंत्र्य सैनिकांना यंगून आणि मांडले तुरुंगात कैद केले होते. 
- मोदींपूर्वी दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, माजी उपराष्ट्रपती हामिद अंसारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह आणि काँग्रेस लीडर सलमान खुर्शीद यांनी सुद्धा बहादुर शाह जफर यांच्या मजारला भेट दिली होती. 
 

दोन्ही देशांमध्ये 11 करार
- बुधवारी मोदींनी म्यानमारच्या स्टेट काउंसर आंग सान सू की यांच्याशी पहिली द्विपक्षीय चर्चा केली. 
- दोघांनी मॅरिटाइम सिक्यॉरिटी आणि संबंध मजबूत करण्यासाठी 11 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. 
- त्यामध्ये लोकशाही संस्थांना आणखी मजबूत करणे, इलेक्शन कमिशन अॅन्ड यूनियन इलेक्शन ऑफ म्यानमार, नेशनल लेवल इलेक्टोरल कमीशन ऑफ म्यानमार इत्यादींचा समावेश होता. 
- त्यातच दोन्ही देशांनी यामेंथिन येथे महिला पोलिसांच्या प्रशिक्षण केंद्राला अपग्रेड करण्यासाठी सुद्धा सहमती दिली आहे. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...