आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Signs Indian Flag To Be Gifted To President Obama

पंतप्रधानांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान? स्‍वयंपाक्‍याला दिला स्‍वाक्षरी करून तिरंगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधानांनी स्‍वाक्षरी करून भेट दिलेला राष्‍ट्रध्‍वज. - Divya Marathi
पंतप्रधानांनी स्‍वाक्षरी करून भेट दिलेला राष्‍ट्रध्‍वज.

न्यूयॉर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्‍या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी प्रसिद्ध शेफ (स्‍वयंपाकी) विकास खन्ना यांना त्‍यांनी भारताच्‍या राष्‍ट्रध्‍वजावर स्‍वाक्षरी करून तो भेट दिला. त्‍यामुळे नियमानुसार हा राष्‍ट्रध्‍वजाचा अपमान असून, मोदी वादात अडकले आहेत. दरम्‍यान, भारत सरकारने विकास यांच्‍याकडून हा तिरंगा परत घेतला. विकास त्‍याला अमेरिकेचे अध्‍यक्ष ओबामा यांना देणार होते.

मोदी यांनी गुरुवारी 47 कंपन्यांचे सीईओ व अध्यक्षांची फाइव्‍ह स्टार होटल वॉल्डोर्फ एस्टोरियामध्‍ये भेट घेतली. दरम्‍यान, विकास यांनी बनवले जेवण घेतले. ते मोदी यांना खूप आवडले. त्‍यानंतर त्‍यांनी स्‍वत: विकास यांची भेट घेतली आणि त्‍यांचे कौतुक केले. एवढेच नाही तर त्‍यांना स्वाक्षरी केलेला तिरंगा भेट दिला.
प्‍लॅग कोड ऑफ इंडियाचे काय आहेत नियम
26 जानेवारी 2002 पासून लागू झालेला प्‍लॅग कोड तीन भागात आहे. यामध्‍ये पार्ट 3 (सेक्शन 5) मध्‍ये भारतीय राष्‍ट्रध्‍वजाच्‍या अवमानाची व्‍याख्‍या स्‍पष्‍ट करण्‍यात आलेली आहे. यामधील 3.28 या मुद्दयानुसार, राष्‍ट्रध्‍वजारा काहीही लिहिण्‍यास सक्‍त मनाई आहे. असे केल्‍यास तो राष्‍ट्रध्‍वजाराचा अवमान समजल्‍या जातो.
मोदी यांनी गळाभेट घेतली : विकास
पंजाबच्‍या अमृतसरमध्‍ये जन्‍मलेल्‍या शेफ विकास यांनी सांगितले की, गुरुवारी मोदी आणि सीईओज यांच्‍यासाठी 26 डिशेज तयार केली होती. डिनरनंतर मोदी यांनी माझी गळाभेट घेतली आणि स्‍वाक्षरी केलेला तिरंगा भेट दिला. यावेळी लॉकहीड मार्टिनचे अध्‍यक्ष मार्लिन ए ह्यूसन, फोर्ड मोटरचे प्रेजिडेंट मार्क फील्ड्स, पेप्सिको कंपनीचे सीइओ इंदिरा नूई, जॉनसन अँड जॉनसनचे प्रेजिडेंट जार्ज मेस्क्विटा यांच्‍यासह जगातील मोठ्या कंपन्‍यांचे CEOs उपस्‍थित होते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज....