आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्विपक्षीय संबंध बळकटीसाठी नरेंद्र मोदी श्रीलंका भेटीवर!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो- पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी श्रीलंकेत दाखल झाले. त्यांचा हा दाेन दिवसीय दौरा आहे. भारत-श्रीलंका यांच्यातील पारंपरिक संबंधाला आणखी बळकट करण्यासाठी मोदी यांच्या भेटीकडे पाहिले जात आहे. श्रीलंकेत चीनने पायाभूत सुविधांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. बेटावरील देश व चीन यांच्यातील जवळिकीमुळे नवी समीकरणे जुळत येत असतानाच मोदी यांनी ही भेट आखली आहे.

भारताच्या मदतीने १५० कोटी खर्चून रुग्णालयाची केली  उभारणी
पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरचा माेदींचा हा दुसरा श्रीलंका दौरा आहे. शुक्रवारी वैशाख दिन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. मोदी देखील या समारंभात सहभागी होतील. बौध्द धर्माचा हा सर्वात मोठा उत्सव आहे. त्याशिवाय भारताच्या सहकार्याने श्रीलंकेत १५० कोटी रुपये खर्चून रुग्णालय उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होईल.

गंगारमय्या मंदिरात दीपोत्सव
कोलंबोतील गंगारमय्या मंदिरालाही मोदी भेट देणार आहेत. तेथे दीपोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान त्यात सहभागी होतील. त्याशिवाय भारतवंशीय तमिळ समुदायाची देखील भेट घेतील. त्यांच्या हस्ते येथे रुग्णालयाचे उदघाटन होणार आहे. २०१५ मध्ये मोदींनी जागतिक वारसास्थळ असलेल्या अनुराधापुरला भेट दिली होती.
बातम्या आणखी आहेत...