आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi's Appointment Will Soon Break Sundar Pichai

नरेंद्र मोदींच्या भेटीची लवकरच संधी मिळेल, गुगलचे नवे सीईओ सुंदर पिचाई यांची अपेक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - जगप्रसिद्ध सर्च इंजिन ‘गुगल’ कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई (४३) यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. भारतात जन्मलेले पिचाई यांचे नाव गुगलच्या सीईओ पदासाठी जाहीर होताच मोदींनी त्यांचे अिभनंदन केले. यावर पिचाई यांनी आभार व्यक्त करून लवकरच मोदींची भेट घेण्याची संधी मला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.तंत्रज्ञानातील या अग्रेसर कंपनीची पुनर्रचना झाल्यानंतर पिचाई यांना सीईओ म्हणून जाहीर करण्यात आले. यानंतर मोदींनी ट्विटरवर त्यांचे अभिनंदन केले.
येत्या सप्टेंबरमध्ये पंतप्रधान मोदी अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीच्या दौऱ्यावर आहेत. येथे एका कार्यक्रमात अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचे प्रमुख मोदींची भेट घेण्याची शक्यता आहे. याच कार्यक्रमात मोदी-पिचाई भेट होण्याची शक्यता आहे, असे सांगितले जाते.

सिलिकॉन व्हॅलीतून शुभेच्छांचा पाऊस
सिलिकॉन व्हॅलीतील नामांकित कंपन्यांच्या प्रमुखांकडून सध्या सुंदर पिचाई यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. २००४ मध्ये गूगलमध्ये रुजू झालेले पिचाई यांची विशेष ख्याती असून मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला, अॅपलचे प्रमुख टिम कूक यांच्यासह अनेक दिग्गजांनी पिचाईंना शुभेच्छा दिल्या. गूगलचे एरिक श्मित आणि गूगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांच्यानंतर पिचाई कंपनीचे तिसरे कार्यकारी प्रमुख असतील. गूगल मॅपचे सहसंस्थापक व फेसबुकचे माजी सीटीओ बेट टेलर यांनीही ट्विटरवर पिचाई यांना शुभेच्छा दिल्या.

कौशल्य अफलातून...
पिचाई यांची विचारसरणी आणि त्यांचे कौशल्य अफलातून आहे. एक महान सीईओ म्हणून त्यांच्यावर नवी जबाबदारी आदली आहे.
एरिक श्मित, गूगलचे कार्यकारी अध्यक्ष