आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐक्याचा आवाज बुलंद, समझने वाले समझेंगे; मोदींचा पाक, दाऊदला इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसीय यूईए दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी दुबई क्रिकेट स्टेडियमवर अनिवासी भारतीयांना संबोधित केले. सुमारे ५० हजार अनिवासी भारतीयांनी मोदींच्या भाषणासाठी गर्दी केली होती. ७० मिनिटांच्या भाषणात मोदी म्हणाले....
1. दहशतवादाविरुद्ध निर्णायक संघर्षाची वेळ आली आहे. जे दहशतवादात गुंतले आहेत, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, हा स्पष्ट संदेश येथून गेला आहे.
2. ‘समझने वाले समझ गए होंगे, अकलमंद को इशारा काफी होता है....’ अशा शब्दांत माेदींनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला तडाखेबंद इशाराही देऊन टाकला.
3. भारतातून यूएईला दर आठवड्याला ७०० हून अधिक विमानाच्या फेऱ्या होतात. तरीही भारताच्या पंतप्रधानाला येथे येण्यासाठी तब्बल ३४ वर्षे लागली.
4. अणुचाचणीनंतर भारतावर निर्बंध अाल्यावर आखाती देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी पाठवलेल्या पैशामुळे देशाला मोठा दिलासा मिळाला.
... आणि चूकही : या भाषणात मोदींकडून एक चूकही झाली. बांगलादेशाशी नुकत्याच झालेल्या कराराबद्दल सांगताना मोदींनी शेख हसीनांचा उल्लेख बांगलादेशच्या राष्ट्रपती असा केला. प्रत्यक्षात त्या पंतप्रधान आहेत.