आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासाच्या अंतराळवीरांचा 6 तास 32 मिनिटांचा यशस्वी स्पेसवॉक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- नासा अर्थात अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेच्या अंतराळवीरांनी नुकताच स्पेसवॉक यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. ५६ वर्षीय पेग्गी व्हिटसन यांच्यासह शेन किमब्रॉग यांनी साडेसहा तासांचा वॉक पूर्ण केला. पेग्गी सर्वाधिक वॉक करणाऱ्या पहिल्या वयस्कर महिला ठरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्रावरील क्षमता वृद्धीसाठी त्याचा फायदा होणार आहे. 
 
नासाचे एक्पिडिशन ५० ही मोहीम सुरू आहे. शेन किमब्रॉग व पेग्गी व्हिटसन यांनी अवकाश स्थानकावर तीन अॅडॉप्टर प्लेट्स जमा केल्या आहेत. त्यातून विद्युत जोडणी शक्य झाली आहे. हा पुरवठा अवकाश स्थानकावरील लिथियमच्या बॅटरींना सुरू करण्यात आला आहे. अंतराळवीरांनी आपल्या अनेक तासांच्या वॉकमध्ये अल्फा मॅग्नेटिक स्पेक्टोमीटरसंबंधी फोटो पाहणीदेखील केली.

दरम्यान, अवकाशस्थानकाबाहेर राहून इंधन तसेच ऊर्जेसाठी अंतराळवीर मोठ्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. त्यासाठी अनेक वेळा स्पेसवॉकचे आयोजन करण्यात आले. आतापर्यंत आयोजित एकूण मोहिमांत १ हजार २२४ तास व ६ मिनिटांचा स्पेसवॉक करण्यात आला आहे.  

- ६ तास ३२ मिनिटांचा हा स्पेसवॉक होता.  
- १९६ एकूण स्पेस वॉकचे आयोजन

अभ्यासासाठी महत्त्वाची इंधनवृद्धी  
अंतराळस्थानकावरील इंधनासाठी जानेवारीपासून बॅटरींना अपडेट करण्याचे काम अतिशय रोबोटिक पद्धतीने केले जात होते. आता मात्र स्पेसवॉकच्या माध्यमातून आणखी इंधनवृद्धी केली जाणार आहे.

व्हिटसन यांच्या नावे अनेक विक्रम  
५६ वर्षीय पेग्गी व्हिटसन नोव्हेंबरमध्ये अंतराळ स्थानकावर पोहोचल्या. त्या वेळीदेखील वयस्कर महिला अंतराळवीर म्हणून त्यांच्या नावे विक्रम नोंदवण्यात आला. नासाची सध्याची मोहीम पूर्ण झाल्यानंतर सर्वाधिक ३७७ दिवस अंतराळात राहणाऱ्या वयस्कर महिला अंतराळवीर म्हणून त्यांचा विक्रम होईल. पुढच्या मोहिमेत त्या सहभागी होतील. तेव्हाही त्यांच्या नावे नवनवीन विक्रम प्रस्थापित होतील. ही मोहिम देखील लवकरच सुरू होणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...