आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीचे छायाचित्र घेण्यात नासाला यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- नासाने १.६ दशलक्ष किलोमीटर अंतरावरून सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या पृथ्वीचे भव्य छायाचित्र घेतले आहे. हे सर्वात भव्य व तेजस्वी असे पहिलेच छायाचित्र आहे. नासाच्या अर्थ पॉलिक्रोमॅटिक इमेजिंग कॅमेऱ्यातून (ईपीआयसी) ही रंगीत प्रतिमा घेण्यात आली. विविध तीन छायाचित्रांना एकत्र करून हे संपूर्ण छायाचित्र साकारण्यात आले आहे. ६ जुलै रोजी हे छायाचित्र घेण्यात अवकाश स्थानक प्रणालीला यश आले. वाळवंट, नद्यांची पात्रे या छायाचित्रात सुस्पष्ट दिसत असल्याचे नासाच्या सूत्रांनी सांगितले.

नासाने घेतलेले छायाचित्र विलोभनीय असून या पृथ्वीच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे, याचे अवधान देणारे ते आहे, असे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी ट्विट केले. डिस्कव्हर अवकाश स्थानकावरून हे छायाचित्र घेण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...