आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NASA च्या व्यावसायीक स्पेसफ्लाईटसाठी भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्सची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युयॉर्क (अमेरिका)- अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने व्यावसायीक स्पेसफ्लाईटसाठी चार अंतराळवीरांची निवड केली आहे. या निर्णयाने अमेरिकेच्या भूमिवरुन अंतराळयान प्रक्षेपित करण्याचा मार्ग खुला झाला आहे. आता खासगी क्षेत्राच्या माध्यमातून कमी उंचीच्या अंतराळ मोहिमा राबविणे नासाला शक्य होणार आहे. आता यासाठी नासाला रशियावर अवलंबून राहावे लागणार नाही.
अंतराळात माणूस पाठविण्याचा उद्योग वाढावा, लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या वाढव्यात आणि स्पेसफ्लाईटसाठी रशियावर अवलंबून राहू नये यासाठी ओबामा प्रशासनाने जाहीर केलेल्या योजनेचा हा निर्णय एक भाग आहे.
याबाबत नासाचे अॅडमिनिस्ट्रेटर चार्ल्स बोल्डन यांनी सांगितले, की चौघांच्या नावाची घोषणा करताना मला आनंद होत आहे. व्यावसायीक तत्त्वावर राबविल्या जाणाऱ्या नासाच्या अंतराळ मोहिमेत हे अंतराळवीर सहभागी होतील. अंतराळात माणूस पाठवण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेला या निर्णयाने भक्कम पाठबळ लाभणार आहे. या चौघांची नावे निश्चितच इतिहासाच्या पुस्तकात मुद्रित होतील. शिवाय मंगळावर अमेरिकी नागरिक पाठविण्याचा हेतूही साध्य केला जाऊ शकेल.

नासाने निवड केलेल्या टीममध्ये अनुभवी अंतराळवीर सुनीता विलियम्स, रॉबर्ट बेनकेन, एरिक बो आणि डगलस हर्ले यांचा समावेश आहे. बोईंग आणि स्पेस-एक्स या कंपन्यांसोबत ते काम करणार आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर साहित्य पोहोचविणे, अंतराळात मानवाला घेऊन जाणे यासाठी क्रू ट्रान्सपोर्ट सिस्टिम उभारण्यासाठी हे चौघे या कंपन्यांना मदत करणार आहेत.

सुनीता विलियम्स अमेरिकी नेव्ही कॅप्टन आहे. ती मुळची गुजरातमधील मेहसाडा जिल्ह्याची आहे. दोन महत्त्वपूर्ण स्पेस फ्लाईटमध्ये ती सहभागी झाली होती. तिने अंतराळात तब्बल 322 दिवसांचा कालावधी व्यतीत केला आहे. एखाद्या महिला अंतराळवीराचा सर्वाधिक काळ स्पेसवॉक करण्याचा (5 तास 40 मिनिटे) रेकॉर्ड तिच्या नावावर आहे.

पुढील स्लाईडवर बघा, नासाने जाहीर केलेल्या चार अंतराळवीरांचे फोटो...सुनीता आहे एकमेव अंतराळवीर महिला....