आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: नासाने 1.6 लाख किलोमीटर अंतरावरुन टिपली चंद्राची \'डार्क साइड\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- नासाने पहिल्यांदाच चंद्राचा अनोखा व्हिडिओ जाहीर केला आहे. डीप स्पेस क्लायमेट ऑब्जर्व्हेट्री (DSCOVR) सॅटेलाईटच्या कॅमेऱ्यात चंद्राचे फोटो घेण्यात आले आहे. याचा व्हिडिओही रेकॉर्ड करण्यात आला आहे. याला 'डार्क साइड ऑफ द मून' असे नाव देण्यात आले आहे. पृथ्वीची परिक्रम पूर्ण करीत असताना 1.6 लाख किलोमीटर दूर अंतरावरुन फोटो घेण्यात आल्याचे नासाने सांगितले आहे. चंद्राची ही बाजू पृथ्वीवरुन कधीही बघण्यात आलेली नाही.
केव्हा घेतले हे फोटो आणि व्हिडिओ
चंद्र जेव्हा पृथ्वीची परिक्रमा करीत होता तेव्हा गेल्या महिन्यात हे फोटो आणि व्हिडिओ घेण्यात आला. यावेळी पृथ्वीच्या रोटेशनवर बारीक नजर ठेवण्यात आली होती. ओझोन आणि अॅडमॉसस्फिअर यासंदर्भात शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता. पॅसेफिक ओशनपासून उत्तर अमेरिकेकडे चंद्र जात असताना हे फोटो टिपण्यात आले आहेत.
कसे घेतले फोटो
नासाच्या अर्थ पॉलीक्रोमॅटिक इमेजिंग कॅमऱ्याच्या (EPIC) माध्यमातून हे फोटो घेण्यात आले. पृथ्वीपासून एक मिलियन माइल्स दूर DSCOVR मध्ये चार मेगा पिक्सल सीसीडी कॅमेरा आणि टेलिस्कोप आहेत. DSCOVR सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये राहून नॅशनल ओशन अॅंड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनसाठी (NOAA) रिअल टाईम सोलर विंड मॉनिटरिंगचे काम करते. हा कॅमेरा वर्षातून दोनदा चंद्र आणि पृथ्वीच्या प्रतिमा टिपतो.
एक्सपर्ट म्हणाले, की चंद्रापेक्षा आपला ग्रह जास्त चमकदार आहे
नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरचे शास्त्रज्ञ अॅडम सजाबो म्हणाले, की पृथ्वी चंद्रापेक्षा जास्त चमकदार असल्याचे समोर आले आहे. ही आश्चर्यकारक बाब आहे. डार्क स्पेसमध्ये आपला ग्रह लुनर सरफेसपेक्षा जास्त चमकदार आहे.
पुढील स्लाईडवर बघा व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...