आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nasa Is Going To Announce Something In Tuesdays Press Conference

मंगळावर मिळाले पाणी! नासाकडून प्रेस कॉन्फरन्समध्ये खुलाशाची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेची अंतराळ संस्था नासा लवकरच मार्स एक्सप्लोरेशन प्रोगामशी संबंधित मोठा खुलासा करू शकते. नासाने रेड प्लॅनेट म्हणजेच मंगळावर पाण्याचा शोध लावला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नासा एक पत्रकार परिषद घेणार आहे. यामध्ये नासा मार्स एक्सप्लोरेशन प्रोग्रामशी संबंधित मोठा खुलासा करणार असल्याची शक्यता आहे.

लुजेंद्र यांचे म्हणणे ठरू शकते खरे
मंगळावर पाणी मिळण्याची शक्यता अधिक दृढ होण्याचे आणखी एक कारण म्हणजे नासाने या घोषणेमध्ये लुजेंद्र ओझा नावाच्या पीएचडी स्टुडंटचा समावेश असल्याचे म्हटले आहे. 2011 मध्ये पदवी िमळवलेल्या 21 वर्षीय लुजेंद्रने मंगळावरण पाणी असल्याचे संभाव्य लक्षणे शोधली आहेत. वैज्ञानिकांना मंडळाच्या ध्रुवावर पाणी साचले असल्याची माहिती आहेत. पण त्याचे द्रवरूप शोधण्यात अद्याप यश आलेले नाही.

ओझा म्हणाले, सुदैवी योगायोग
अॅझोना युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणादरम्यान ओझाला योगायोगाने मंगळावर द्रवरुपात पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते. या ग्रहाच्या पृष्ठभागाच्या अभ्यासादरम्यान त्यांना याबाबत पुरावे मिळाले होते. ओझा यांनी हा शोध म्हणजे सुदैवी योगायोग असल्याचे म्हटले होते. सुरुवातीला आपल्यालाही याबाबत काही लक्षात आले नाही असे ते म्हणाले होते. मंगलाच्या पृष्ठभागावर तयार झालेल्या खड्ड्यांचा अनेक वर्ष अभ्यास केल्यानंतर हे खड्डे वाहत्या पाण्यापासूनच तयार झाले असल्याचे समोर आले आहे.
40 वर्षांपूर्वी मिळाले होते बर्फाचे पुरावे
मंगळावर पाण्याचे पुरावे मिळणे यात काही नवीन नाही. सुमारे चार दशकांपूर्वी या प्लॅनेटच्या पोलवर बर्फाचा शोध लावण्यात आला होता. त्याशिवाय ग्रहाच्या पृष्ठभागावर असलेल्या खुणा याकडे इशारा करतात की, लाखो वर्षांपूर्वी येथे समुद्र आणि नद्या असाव्यात. तसे पाहता या ग्रहावर गुरुत्वाकर्षणाची कमतरचा आणि त्याठिकाणच्या हवामानामुळे याठिकाणी असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन झाले असल्याचा अंदाज लावला जात आहे. या ग्रहावर द्रवरुप पाणी असल्याचा शोध प्रथमच लागला आहे.
हे असतील प्रेस कॉन्फरन्समध्ये..
- जिम ग्रीन, डायरेक्टर ऑफ प्लॅनेटरी सायन्स, नासा हेडक्वार्टर.
- मायकल मेयर, मार्स एक्सप्लोरेशन प्रोग्रामचे लीड साइंटिस्ट, नासा हेडक्वार्टर.
- लुजेंद्र ओझा, जॉर्जिया इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, अटलांटा.
- मेरी बेथ विल्हेम, नासा एम्स रिसर्च सेंटर, मोफेट फील्ड, कॅलिफोर्निया आणि जॉर्जिया इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी.
- अल्फ्रेड मॅक्वेन, प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर फॉर हाय रेझोल्यूशन इमेजिंग सायन्स एक्सपेरीमेंट, युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोना, टक्सन.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS