आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nasa Mars Rover Opportunity Celebrated 12th Anniversary

असा दिसतो मंगळग्रह, नासाने 12 वर्षांमध्‍ये टिपली अशी छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळ ग्रहाचा व्हिक्टोरिया क्रेटर. - Divya Marathi
मंगळ ग्रहाचा व्हिक्टोरिया क्रेटर.
नासा अनेक वर्षांपासून मंगळग्रहावर जीवसृष्‍टीचा शोध घेत आहे. मंगळाच्या पृष्‍ठभागावर काम करत असलेल्या नासाच्या रोवर अपॉर्च्युनिटीने या महिन्यात (25 जानेवारी)12 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याने वेळोवेळी मंगळाची छायाचित्रे पाठवली आहेत.
12 वर्षांत 2 लाखांपेक्षा जास्त छायाचित्रे...
- नासाने मार्स रोवर अपॉर्च्यनिटीला अंतराळात 2003 मध्‍ये पाठवले होते.
- 25 जानेवारी 2004 मध्‍ये ते मंगळावर उतरले.
- 144 महिन्यांमध्‍ये अपॉर्च्युनिटी रोवरने मंगळाची 2 लाखापेक्षा जास्त छायाचित्रे टिपली आहेत.
- नासाचा आणखी एक रोवर क्युरोसिटीही 2011 पासून मंगळाच्या पृष्‍ठभागावर काम करत आहे.
- हवामान, खडक आणि धातूंच्या शोधात नासाचे यान मंगळाला परिक्रमा घातल आहे.
- या ग्रहावरील माती, पाणी आणि पर्वतांची माहिती जमा करत आहे. तसेच मंगळाची छायाचित्रे आणि डाटा पृथ्‍वीवर पाठवत आहेत.

मंगळावर पाणी सापडल्याचा, नासाचा दावा
- नासाने मागील वर्षी मंगळ ग्रहावर हजारो वर्षापूर्वी पाण्‍याचा तलाव असल्याचा दावा केला होता.
- या अंतराळ संस्थेनुसार, मंगळावर अनेक नद्या आणि तलाव होते. क्युरियोसिटी रोवरकडून मिळालेल्या डाटाच्या आधारावर नासाने स्पष्‍ट केले.
- नासाने नंतर खुलासा केला, की सौर ज्वालांमुळे मंगळ ग्रहावरील पाणी आटले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, नासाच्या रोवर्संनी पाठवलेली मंगळ ग्रहाची छायाचित्रे...