आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nasa Mars Rover Spots A Dark Lady Watching It From The Surface

मंगळावर महिला दिसल्याचा दावा, नासाच्या PHOTO वरून नव्या चर्चेला सुरुवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नासाने जारी केलेले मंगळाचे फोटो. वर्तुळात दाखवलेली आकृती महिलेची असल्याचा दावा केला आहे. - Divya Marathi
नासाने जारी केलेले मंगळाचे फोटो. वर्तुळात दाखवलेली आकृती महिलेची असल्याचा दावा केला आहे.
मंगळावर संशोधन करत असलेल्या नासाच्या क्युरॉसिटी रोव्हरने पाठवलेल्या एका फोटोवरून नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. नासाने जारी केलेल्या फोटोमध्ये एक आकृती दिसत आहे. ही आकृती एखाद्या ठेंगण्या व्यक्तीसारखी दिसते. एलियन्सच्या अस्तित्वाचा शोध घेणारे जगभरातील संशोधक ही एखाद्या महिलेची आकृती असल्याचे सांगत आहेत. यूएफओ संदर्भात संशोधन करणारी वेबसाईट यूएफओ सायटींग डेलीनुसार फोटोमध्ये दिसणारी ही आकृती एखाद्या महिलेप्रमाणे दिसत आहे. विशेष म्हणजे ही आकृती 8 ते 10 सेंटीमीटरच्या सुमारास असेल, असे सांगितले जात आहे.

एलियन्सच्या आयुष्यावर संशोधन करणा-या स्कॉट सी वेअरिंगनुसार, ही आकृती एखाद्या महिलेप्रमाणे दिसत आहे. यात दोन हातांसह डोक्यावर लांब केसही दिसत आहेत. वेअरिंगच्या मते, हा एखादा पुतळा आहे की जिवंत प्राणी हे लगेचच सांगणे कठीण आहे. मात्र, त्याचवेळी हा पुतळा असण्याची शक्यता कमी असल्याचेही म्हटले आहे. एवढा लहान पुतळा सहज नष्ट होऊ शकतो. त्यामुळे हा सजीव प्राणी असण्याची शक्यता अधिक असल्याचे वेअरिंग यांनी म्हटले आहे.

वेअरिंग म्हणाले, याठिकाण जीवन असून याबाबत जगातील सर्व देशांनी विचार करायला हवा. नासाने मात्र अशाप्रकारच्या कोणत्याही शोधाबाबतचे वृत्त फेटाळले आहे. अनेक शास्त्रज्ञांच्या मते, ही पेरिडोलिया (pareidolia) म्हणून ओळखली जाणारी एक मानसिक घटना आहे. यामध्ये डोळ्यांना ओळखीचे ऑब्जेक्ट आणि शेपबाबत संभ्रम निर्माण होत असतो. सोशल साइट्सवर हे फोटो 'वुमन ऑन मार्स' च्या कॅप्शनसह व्हायरल होत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO