आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nasa New Horizons Spacecraft Ears Historic Flyby Of Pluto

PHOTOS नासाच्या स्पेसक्राफ्टने रचला इतिहास, जवळून घेतले प्लुटोचे फोटो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यू होराइजन्स स्पेसक्राफ्टने 15 जुलै रोजी पाठवलेले प्लुटोचे छायाचित्र. - Divya Marathi
न्यू होराइजन्स स्पेसक्राफ्टने 15 जुलै रोजी पाठवलेले प्लुटोचे छायाचित्र.
वॉशिंग्टन - अमेरिकी अंतराळ संस्था नासाच्या "न्यू होराइजन्स' अंतराळयानाने इतिहास रचला आहे. साडे नऊ वर्षे दीर्घ प्रवासानंतर मंगळवारी यान लहान ग्रह प्लुटोच्या जवळ पोहोचले. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५ वाजून १९ मिनिटांनी प्लुटोच्या पृष्ठभागापासून जवळपास १२,५०० किमी दूर अंतरावरून यान गेले.
यानानुसार, प्लुटोचा आकार आतापर्यंतच्या अंदाजापेक्षा खूप मोठा आहे. न्यू होराइजन्सने पाठवलेली छायाचित्रे आणि माहितीतून शास्त्रज्ञांना क्वीपर बेल्टचे कोडे उलगडण्यात मदत मिळेल. १९ जानेवारी २००६ रोजी यानाचे प्रक्षेपण झाले होते. यानाने ४५ हजार किमी ताशी वेगाने आतापर्यंत ४८० कोटी किमीचा प्रवास पूर्ण केला आहे. होराइजन्सचा वेग जगातील सर्वात वेगाने उड्डाण करणारे अमेरिकी लष्कराचे विमान एसआर - ७१ लॉकहीडपेक्षा १६ पटीने जास्त आहे. लॉकहीडचा सर्वाधिक वेग ताशी ३,५४० किमी आहे.
नासाचे यान प्लुटोजवळून गेले, गुगलनेही बनवले डुडल

प्लुटोसंदर्भात
{ प्लुटोचा शोध १८ फेब्रुवारी १९३० मध्ये लागला होता.
{आकारात सर्वांत लहान असल्यामुळे त्यास लघुग्रह संबोधले जाते.
{ पृथ्वीपासून प्लुटोचे अंतर ७.५ अब्ज किमी आहे.

गुगलकडूनही आनंद साजरा
सर्च इंजिन गुगलने मंगळवारी न्यू होरायजन अंतराळयानाचे यश साजरे करत एक आकर्षक डुडल तयार केले. यामध्ये न्यू होरायजनला बर्फाने भरलेल्या या छोट्या ग्रहाजवळून जाताना दाखवले आहे.

क्वीपर बेल्ट काय आहे? : हा सौरमंडळाचा एक भाग आहे आणि प्लुटो, हॉमिया आणि मेकमेकचे ते घर आहे. यावर ग्रहाप्रमाणे गोलाकार आणि मोठे पिंड आहेत. मात्र, त्यांना ग्रह मानले जात नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, प्लुटोचे न्यू होराईझन्सने घेतलेले फोटो...