आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासाचा आता "केमिकल लॅपटॉप', परग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी नवा प्रयोग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- पृथ्वी ग्रहाबाहेर जीवसृष्टीची शक्यता धुंडाळण्यासाठी अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था "नासा' केमिकल लॅपटॉप विकसित करत आहे. लॅपटॉपद्वारे अन्य ग्रहांवरील अमिनो अॅसिड आणि फॅटी अॅसिडचे अस्तित्व शोधले जाणार आहे. कॅलिफोर्नियाच्या पासडेनातील नासाच्या जेट प्रोपुल्शन लॅबोरेटरीत (जेपीएल) जीवसृष्टीसाठी आवश्यक रसायनांचे विश्लेषण केले जाणार आहे.
संबंधित उपकरण पृथ्वीबाहेर सोडल्यास अशा प्रकारचे ते पहिले संवेदनशील उपकरण ठरणार आहे. उपकरण अमिनो अॅसिड आणि फॅटी अॅसिडचा शोध घेण्यात सक्षम असेल, अशी माहिती जेपीएलमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ जेसिका क्रिमर यांनी दिली. केमिकल लॅपटॉप ही छोटी चालती फिरती प्रयोगशाळा असून भविष्यात ती एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाण्यास सक्षम ठरेल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कसा आहे केमिकल लॅपटॉप