आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवनिर्मित जिवाणू मंगळावर सोडणार, पृथ्वीसारखे वातावरण निर्मितीचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - मंगळावरील वातावरण पृथ्वीप्रमाणेच बनवण्यासाठी अमेरिकेतील संशोधक मानवनिर्मित जिवाणू आणि वनस्पतींचा उपयाेग करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेतील डिफेन्स अॅडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी (डीएआरपीए) यासाठी प्रयत्न करत असून मंगळावर झाडे उगवून तसेच प्रकाश संश्लेषण प्रक्रिया घडवून आणून वातावरण निर्मिती करण्याचा त्यांचा मानस आहे.
मंगळावर पृथ्वीसारखे वातावरण तयार करण्यासाठी प्रथमच अशाप्रकारची योजना आखण्यात आली असून आम्हाला त्याठिकाणी केवळ भेट द्यायची नसून मानवी वस्ती बनवायच्या आहेत, असे मत डीएआरपीएकडून व्यक्त करण्यात आले आहे. यासाठी मागच्या वर्षभरापासून जॅक्सन्स प्रयोगशाळेत जैविकरीत्या सर्व प्रकारच्या सजीवांच्या निर्मितीसाठी प्रयोग सुरू आहे. सध्या निसर्गात ३० अब्ज सजीव आहेत. या प्रयोगासाठी अभियांत्रिकी जीवविज्ञानाच्या दृष्टीने काही सजीवांचा उपयोग केला जाईल. मात्र, त्यात कोळी प्रजातीचा समावेश नसेल.
प्रजातींसाठी तयार केले सॉफ्टवेअर
संशोधनासाठी डीएआरपीएने काही अन्य संशोधन संस्थांच्या मदतीने डीटीए जीव्हिव्यू नामक सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्या जॅक्सनकडून गुगल मॅप्स ऑफ जेनोम्स असे नाव देण्यात आले आहे. जेनोम्समध्ये काही विशेष प्रोग्राम तयार करण्यात आले असून त्यात विविध प्रजाती आणि त्यांच्या वास्तव्यासंबंधी सर्व माहिती मिळेल.
बातम्या आणखी आहेत...