आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासाच्या दुर्बिणीने शोधला महाकाय आकाशगंगा समूह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेच्या (नासा) दुर्बिणीने भव्य आकाशगंगा समूहाचा शोध लावला आहे. पृथ्वीपासून ८.५ दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या या आकाशगंगेचे एवढे भव्य रूप शास्त्रज्ञांना प्रथमच पहावयास मिळाले आहे.

या रचनेमध्ये हजारो आकाशगंगा गुरुत्वबलाच्या आधारे जोडल्या गेल्या असून यात शेकडो दशलक्ष तारे आहेत. विशेष म्हणजे आकाशगंगांचा हा समूह वरचेवर वाढत चालला असून अजूनही त्यान नवनवीन तारे जोडले जात आहेत. हा आकाशगंगांचा समूह कशा अवस्थेतून निर्माण झाला याचा शास्त्रज्ञ शोध घेत आहेत. याकरिता शास्त्रज्ञांनी या ब्रह्मांडाच्या प्राथमिक अवस्थेकडे लक्ष वेधले आहे. पृथ्वीपर्यंत एखादा प्रकाश पोहोचण्यासाठी ठरावीक कालावधी लागतो. त्यामुळे भूतकाळातील दूर अंतरावरील काही वस्तू आपण पाहू शकतो. या तत्त्वाच्या आधारे सापडलेल्या नव्या आकाशगंगांच्या निर्मितीचा अभ्यास केला जात आहे. पृथ्वीच्या िनर्मितीच्याही पूर्वी हा आकाशगंगा समूह अस्तित्वात असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. या आकाशगंगा समूहाच्या शोधामुळे ब्रह्मांडाच्या निर्मितीमागचे गूढ सापडण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटते.