वॉशिंग्टन - पृथ्वीवर अतिमानवांचा ( एलियन) वावर होता, यासंबंधीचे स्पष्ट पुरावे २०२५ पर्यंत सादर करणार असल्याचा दावा नासाने केला आहे. याशिवाय साक्षात अतिमानवांचा शोध २०३५ ते २०४० पर्यंत लागण्याचा निश्चयी दावा नासाच्या वरिष्ठ संशोधकांनी केला आहे.
पृथ्वीशिवाय इतरत्र मानवी जीवनाचे अस्तित्व सिद्ध करण्यास दशकभराचा काळ लागण्याची शक्यता या वेळी वर्तवण्यात आली. त्याचे सुस्पष्ट पुरावे प्राप्त करण्यास २० -३० वर्षांचा काळ लागणार असल्याचे नासाचे प्रमुख संशोधक अॅलेन स्टोफॅन यांनी सांगितले. ‘पृथ्वीशिवाय विश्वात मानवी वसाहतींची शक्यता’ या विषयावरील चर्चासत्रात स्टोफॅन बोलत होते. नासाला या संशोधनाची दिशा सापडली आहे. नासाच्या संशोधनाच्या अचूकतेबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला व तंत्रज्ञानाच्या मर्यादेमुळे अद्याप अतिमानवांचे अस्तित्व सिद्ध होऊ शकले नसल्याचे ते म्हणाले.
अतिमानव आपल्यापेक्षा एका पिढीने आधुनिक :
आपल्या सूर्यमालेत व त्याबाहेरही मानवाचे अस्तित्व लवकरच सिद्ध होईल, असे नासाचे सहप्रशासक जॉन ग्रुन्सफेल्ड यांनी म्हटले आहे. आपण त्यांच्यापेक्षा एका पिढीने मागे असल्याचे मत ग्रुन्सफेल्ड यांनी व्यक्त केले. आकाशगंगेतही अशा अतिमानवांचे अस्तित्व असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. मंगळावरही प्राचीन काळी महासागर असल्याच्या खुणा सापडल्या आहेत. अतिक्षारयुक्त पाण्यामुळे त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली.