नॅशनल जिओग्राफिक ट्रॅव्हलर फोटो कॉन्टेस्टचे विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. याचे पहिले पारितोषिक मेक्सिकोचे फोटोग्राफर अनुअर पातजेन फ्लोरिउकल मिळाळे. त्याने मेक्सिकोच्या रोका पार्टिडा आयलंडजवळ क्रूजद्वारे समुद्रातील महाकाय व्हेल आणि तिच्या पिलांबरोबर डायव्हींग करणार्या डायव्हर्सचे फोटो काढले होते. या फोटोलाच पहिले बक्षीस मिळाले आहे. पहिले दुसरे आणि तिसरे बक्षीस प्लेस कॅटेगरीमध्ये देण्यात आले आहे. तर इतर सात फोटोग्राफर्सना मेरिटच्या आधारावर बक्षीस देण्यात आले.
प्रथम पारितोषिक मिळवणारा फोटोग्राफर अनुअरने सांगितले की, मी काहीही खास प्लॅनिंग करून हे फोटो काढले नाहीत. मी व्हेलच्या डोक्याजवळ फोटो घेत होतो, तेवढ्यात हा मासा डायव्हींग करणा-या टीमबरोबर पोहू लागला. त्याचवेळी मी योग्य शॉटवर फोटो क्लिक केला. नॅशनल जिओग्राफिक फोटो कँपन अंतर्गत कोस्टारिका आणि पनामा कॅनलमध्ये आठ दिवस टूरची संधी मिळणार आहे.
नॅशनल जिओग्राफिक गेल्या 27 वर्षांपासून ही कॉन्टेस्ट चालवते. त्यात ट्रॅव्हल पोर्ट्रेट, आऊटडोर सीन्स, सीन्स ऑफ प्लेस आणि स्पॉन्टेनियस मोमेन्ट यांचा समावेश असतो. यावर्षी चार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये एकूण 17,000 फोटो आले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा. नॅशनल जिओग्राफिक ट्रॅव्हरवर कॉन्टेस्टचे अवॉर्ड विनिंग PHOTOS...