आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nawaz Power To Speak On What Was Really In The Ajenda

भारताच्या अजेंड्यावर बोलायला नवाझ यांना काय सत्ता उलथवून घ्यायची होती?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवाझ यांच्या भेटीतून भारतीय मुत्सद्दी जरा जास्तच आनंदी झाले. पाकिस्तान काश्मीर मुद्दा सोडून दोन पावलेही पुढे सरकत नाही हे ते विसरले. त्यांच्या कोणत्याही सरकारने धाडस दाखवले तर लष्कर सत्ता उलथवून टाकते. चर्चेत काश्मीर केंद्रस्थानी नसल्याच्या कारणावरून पाकिस्तानातील राजकारण तापले होते. यानंतर शरीफ सरकारला त्याची जाणीव झाली होती. शरीफ यांनी ज्या तीन मुद्द्यांना संमती दिली, त्याचा अर्थ सत्तेवर पाणी सोडणे हा होता.
पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांच्या वक्तव्याकडे नीट लक्ष दिल्यावर ते लक्षात येईल. काश्मीरशिवाय भारताशी चर्चा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. एवढेच नव्हे तर भारत बलुचिस्तानमध्ये हस्तक्षेप करत आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी ही बाब भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तसे सांगितले आहे. विशेष म्हणजे ही गोष्ट आतापर्यंत बाहेर आली नाही.
नवाज शरीफ यांनी विदेशात कोणतेही आश्वासन दिले तरी पाकिस्तानातील सर्व शक्तिशाली संस्थांचे समाधान केल्याशिवाय त्याची अंमलबजावणी शक्य नाही हे भारतीय पक्ष विसरला. यामध्ये लष्कर, अतिरेकी संघटनेचा समावेश आहे. भारताने स्टेट अॅक्टर्स आणि नॉन स्टेट अॅक्टर्सना आपल्या नव्हे तर पाकच्या दृष्टिकोनातून पाहावे, अशी पाकची इच्छा आहे.