आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीफांच्या ताेंडी दहशतवाद्यांचीच भाषा; अतिरेकी बुरहान वानीचा \'युवा नेता\' म्हणून उल्लेेख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्रसंघ - पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या वेळीही संयुक्त राष्ट्रसंघात पुन्हा एकदा अापल्या खोटारडेपणाची साक्ष देत काश्मीर मुद्दा उपस्थित केला. भारतावर खोटेनाटे आरोपही केले. काश्मीरमध्ये भारतीय सैनिक मानवाधिकाराचे उल्लंघन करत असल्याचे सांगत खोऱ्यात दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराचे निर्लज्जपणे समर्थनही केले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. हिजबुल मुजाहिदीनचा अतिरेकी बुरहान वानी याचा ‘युवा नेता’ असा उल्लेख करून दहशतवादी संघटनांचीच भाषा ते बोलत राहिले. भाषणादरम्यान खोटारडे आरोप करणारे शरीफ अडखळताना जगानेही पाहिले. वीस मिनिटांच्या भाषणात निम्म्याहून अधिक वेळ ते काश्मीरवरच बोलत राहिले.

काश्मीरमधील हिंसाचाराची व हत्यांची चौकशी करण्यासाठी सत्यशोधन पथक काश्मीर खोऱ्यात पाठवावे, अशी मागणीही शरीफ यांनी रेटून धरली. काश्मीर खोऱ्यातील संचारबंदी उठवण्यात यावी व फुटीरवाद्यांना परदेशात जाण्याची परवानगी देण्यात यावी, असेही ते म्हणाले.
काश्मीर मुद्द्यावर जोवर तोडगा निघत नाही तोवर भारत-पाकिस्तानदरम्यान सौहार्द प्रस्थापित होणार नाही, असे स्पष्ट करून दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने भारताशी चर्चा करण्याची पाकची तयारी असल्याचे ते म्हणाले. मात्र, भारत या चर्चेसाठी अटी लादत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भारताने अण्वस्त्रे नष्ट करावीत : भारताने अण्वस्त्रे नष्ट करावीत म्हणून जागतिक स्तरावरून भारतावर दबाव आणावा, असे आवाहन करण्यासही शरीफ विसरले नाहीत.
शरीफ यांनी भाषणात वारंवार जम्मू-काश्मीरचा उल्लेख ‘भारताने बळकावलेला प्रदेश’ असा केला. अण्वस्त्रांची स्पर्धा व तणावाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात युद्धाचे संकेतही त्यांनी नकळत दिले.
पुढे वाचा...
> वानीच्या उल्लेखावर भारताचा तीव्र आक्षेप
> उलट्या बोंबा...
बातम्या आणखी आहेत...