आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nawaz Sharif Said Pakistan Is Ready For Dialogue With India Without Preconditions

पाकिस्तानचा यू-टर्न : शरीफ म्हणाले- पूर्वअटींशिवाय भारतासोबत चर्चेला तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेटा (मेल्टा) - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दोन महिन्यात यू-टर्न घेतला आहे. ते म्हणाले, पाकिस्तान भारतासोबत चर्चा करण्यास तयार आहे, तेही कोणत्याही पूर्वअटींशिवाय. महत्त्वाची बाब म्हणजे दोन महिन्यांपूर्वी नवाज शरीफांनी यूनायटेड नेशन येथील भाषणात भारतासोबतच्या चर्चेसाठी चार अटी ठेवल्या होत्या.

काय म्हणाले नवाज
माल्टा येथे कॉमनवेल्थ देशांच्या परिषदेसाठी गेलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ म्हणाले, 'शांततेसाठी आम्ही भारतासोबत कोणत्याही अटी-शर्तींशिवाय चर्चा करायला तयार आहोते.'

याच वर्षी ऑगस्टमध्ये पाकिस्तानने भारतासोबतची नवी दिल्लीत होणारी एनएसए स्तरावरील बैठक रद्द केली होती. त्यावेळी पाकिस्तानने काश्मीर हा बैठकीचा मुख्य अजेंडा राहील आणि फुटीरतावाद्यांसोबत चर्चा करण्याची अट ठेवली होती.
याआधी रशियातील उफा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरीफ यांची भेट झाली होती. त्यानंतर दोन्ही देश ज्या मुद्यांवर चर्चेला तयार झाले होते त्यात काश्मिर मुद्दा नव्हता. मात्र दोन दिवसानंतरच पाकिस्तानने पलटी मारली होती. जोपर्यंत अजेंड्यावर काश्मिर येणार नाही तोपर्यंत भारतासोबत चर्चा नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली होती.

पाकिस्तान म्हटले होते - काश्मिरशिवाय चर्चा निष्फळ
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील बैठक रद्द झाल्यानंत पंतप्रधान शरीफ यांनी त्यांच्या कॅबिनेट बैठकीत काश्मिरमुद्दा उपस्थित केला होता. ते म्हणाले होते, 'दोन्ही शेजारी देशांदरम्यान काश्मिर मुद्याशिवाय चर्चा होण्याला काही अर्थ नाही आणि ते शक्य देखील नाही.'