आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK परराष्ट्र सचिव US मधील पत्रकार परिषदेत म्हणाले- या इंडियनला पहिेले बाहेर काढा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतीय पत्रकाराचे उत्तर देण्याचे टाळले. - Divya Marathi
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतीय पत्रकाराचे उत्तर देण्याचे टाळले.
न्यूयॉर्क - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी जम्मू-काश्मीरमधील उरी हल्ल्यासंदर्भातील प्रश्नाला न्यूयॉर्कमध्ये उत्तर देणे टाळले आहे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेसाठी शरीफ येथे आले आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय पत्रकाराने शरीफ यांना उरी हल्ल्यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर मौन बाळगत शरीफ तिथून निघून गेले. दुसरीकडे पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांनी एका भारतीय महिला पत्रकारावर ओरडत या इंडियनला पहिले बाहेर काढा असे फर्मावले.
काय झाले पत्रकार परिषदेत
- मंगळवारी न्यूयॉर्कमधील रुझवेल्ट हॉटेलमध्ये एजाज अहमद चौधरी यांची पत्रकार परिषद आयोजित केली गेली होती.
- ते पत्रकार परिषदेल्या पोहोचल्याबरोबर त्यांनी भारतीय पत्रकार नम्रता बरार यांच्याकडे इशारा करत या इंडियन जर्नलिस्टला पहिले बाहेर काढा, असे सांगितले.
- नम्रता या एनडीटीव्हीच्या पत्रकार आहेत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, चौधरी यांच्या पत्रकार परिषदेला भारतीय मीडियाला निमंत्रित केले गेले नाही आणि त्यांना प्रवेशही दिला नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शरीफ यांनी घेतली जॉन केरी यांची भेट...
बातम्या आणखी आहेत...