आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर्मनीत नाझी गुन्हेगारांना कठोर शिक्षा ठोठावण्याचे पर्व सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेटमोल्ड, जर्मनी - फेब्रुवारीच्या एका कडाक्याच्या थंडीतील सकाळी उत्तर जर्मनीतील डेटमोल्ड या छोट्या शहरातील न्यायालयात आयरीन वीस धीरज समवेत कोणाची वाट पाहत होते. हिटलरच्या काळातील जी नाझी छळ छावणी उभारण्यात आली होती, त्यातील माजी गार्ड रीनहोल्ड हेनिंग यांच्या विरोधात त्या साक्ष देण्यासाठी आल्या होत्या. या खटल्याची सुनावणी उशिरा सुरू झाली कारण, ९४ वर्षांच्या हेनिंग यांना कोर्टात जाण्यासाठी व्हिल चेअर येईपर्यंत वाट पाहावी लागली. त्यांच्या प्रकृतीमुळे सुनावणीची कारवाई आठवड्यातून फक्त दोन दिवस प्रत्येकी दोन तासच चालते. यामुळे ८५ वर्षीय वीस यांना जर्मनीत आणखी काही काळ थांबावे लागत होते. अनेक दिवसांपासून ते याचीच वाट पाहत होते.

शेवटी हेनिंग यांचे व्हिल चेअर येते. कोर्ट रुममधील पत्रकार आणि छायाचित्रकारांपासून ते आपला चेहरा लपवतात. हा कमजोर वृद्ध आशविट्ज यातना शिबिरात तरुण गार्ड होता यावर विश्वास बसत नाही. जानेवारी १९४३ ते जून १९४४ दरम्यान १ लाख ७० हजार लोकांच्या हत्येत मदत करण्याचा हेनिंग यांच्यावर आरोप आहे. या सर्व लोकांना गॅस चेंबरमध्ये घालून मारण्यात आले होते. त्या दरम्यान १३ वर्षाची वीस आशविट्ज यहुदी कैदी म्हणून बंदी होत्या. त्यांच्या कुटुंबियांना ठार करण्यात आले होते. या खटल्यातील साक्षीदारांपैकी त्या एक आहेत.

वीस या वैयक्तिकपणे हेनिंग यांना ओळखत नाहीत. यातना शिबिरातून वाचलेले आणि या खटल्यात साक्ष देणारे लोकही त्यांना ओळखत नाहीत. हिटलरच्या नाझी जर्मनीत जनसंहारासाठी कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांनाही शिक्षा देण्याच्या नव्या कायदेशीर तरतुदीचा एक भाग म्हणून ही कारवाई महत्त्वाची ठरते.

नाझी आरोपींसंदर्भात संशोधन करणारे कायदेतज्ज्ञा लॉरेन्स डग्लस म्हणतात की, काही न होण्यापेक्षा उशीर झालेला चांगला. या नवीन खटल्यांचे प्रतिकात्मक महत्त्व मोठे आहे. नाझी आरोपींना शिक्षा देण्यासाठी अनेक दशकांपासून संघर्षरत जर्मनीत कायदेशीर प्रणाली शेवटी न्याय मिळवून देत आहे हेच महत्त्वाचे आहे. या वर्षात तीन अन्य खटल्यांची सुरुवात होईल. वीस यांनी जबाबात सांगितले की, १९४४ साली त्यांना परिवारासमवेत आशविट्ज शिबिरात पाठवण्यात आले. पोशाखामुळे माझे वय १४ वर्षापेक्षा अधिक वाटत होते. त्या वेळी गेस्ट चेंबरमध्ये १४ वर्षापेक्षा कमी मुलांनाही पाठवले जात होते. इकडे हेनिंग यांनी २९ एप्रिल रोजी आपले मौन सोडले. त्यांनी न्यायालयात सांगितले की, एका अपराधी संघटनेशी माझा संबंध आल्याचे मला खूप वाईट वाटते. याबद्दल मी क्षमा मागतो.
(सोबत मेरिल फेब्री, न्यूयॉर्क)

(फोटो : माजी नाझी गार्ड रिनहोल्ड हेनिंग २९ एप्रिल रोजी व्हील चेअरवरून न्यायालयात जाताना.)
बातम्या आणखी आहेत...