आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजारच्या देशाकडूनच दहशतवादाला खतपाणी, मोदींचा पाकवर पुन्हा निशाणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिएंतिएन- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. ‘आमच्या शेजारचा एक देश दहशतवादाला खतपाणी घालत असून दहशतवाद निर्यात करत आहे. दहशतवाद पोसणाऱ्या अशा देशाला एकाकी पाडून त्याच्यावर निर्बंध लादा,’ असे आवाहन त्यांनी पाकिस्तानचे नाव घेता आशियान परिषदेत जागतिक समुदायाला केले.

परिषदेला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि चीनचे पंतप्रधान ली केकियांग हेही उपस्थित होते. मोदी म्हणाले की, आमच्या शेजारचा देश दहशतवादाला खतपाणी घालत आहे.

दहशतवादाच्या निर्यातीमुळे शांततेची संधी कमी होत असून हिंसाचार वाढत आहे. दहशतवाद पोसणाऱ्या अशा देशाला एकाकी पाडून त्याच्यावर निर्बंध घालण्याची वेळ आता आली आहे. फक्त दहशतवाद्यांनाच लक्ष्य करता त्यांना पाठिंबा देणाऱ्या यंत्रणेलाही संपवणे गरजेचे आहे. ज्यांनी आपल्या देशाच्या धोरणातच दहशतवादाचा समावेश केला आहे, अशांच्या विरोधात कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

जगासमोर दहशतवाद हेच मोठे आव्हान आहे, असे मत व्यक्त करून मोदी म्हणाले की, भारत आणि दक्षिण आशियातील देश शांततेच्या मार्गाने आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करत आहे; पण शेजारील ‘एक’ देश त्याला अपवाद आहे. विभागीय एकात्मता आणि सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आशियान परिषद प्रयत्नशील राहील, अशी आशा आहे. आशियान नि:शस्त्रीकरणासाठी वचनबद्ध आहे आणि त्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी तसेच विभागीय सर्वंकष आर्थिक भागीदारीला पाठिंबा देण्यास भारत वचनबद्ध आहे. आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य आणखी दृढ करण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा उल्लेखही मोदींनी केला.
बातम्या आणखी आहेत...