आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या तोंडी ‘भारताची भाषा’; मोदी-ट्रम्प भेटीने शेजारी अस्वस्थ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- ‘काश्मिरींचे रक्त महत्त्वाचे नाही’ हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवरून स्पष्ट झाले आहे. आता अमेरिकेच्या तोंडून भारताची भाषा बोलली जात आहे, अशा शब्दांत पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार यांनी भारताविरोधात कांगावा केला आहे.  

भारतातील सरकार काश्मीरमध्ये मानवी हक्कांची खुलेआम पायमल्ली करत आहे. खरे तर भारताची काश्मिरातील कारवाई कोणत्याही विवेकी देशाच्या दृष्टीने चिंतेचे कारण ठरेल, असे निसार यांनी म्हटले आहे. आता अमेरिकेला काश्मिरींचे सांडलेले रक्त महत्त्वाचे वाटत नाही, असा दावा निसार यांनी केला. काश्मीरमधील कारवायांमुळे न्यायाची मूल्ये व आंतरराष्ट्रीय नियमांना हरताळ फासण्याचे काम झाले आहे. भारताने दुटप्पीपणा केला आहे. अमेरिकेचाही चेहरा समोर आला आहे. पाकिस्तानातील सरकार काश्मिरींच्या हक्काबाबत कोणतीही तडजोड करण्यास तयार होणार नाही. काश्मिरींना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. पाकिस्तान काश्मिरींच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असे िनसार म्हणाले.  

सलाहुद्दीनला जागतिक दहशतवादी जाहीर केल्याने तीव्र नाराजी
मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्या सईद सलाहुद्दीनला जागतिक दहशतवादी असल्याचे जाहीर केले. त्यावरून पाकिस्तानात नाराजी आहे. एवढेच नव्हे तर ट्रम्प यांनी जैश-ए-मोहंमद, लष्कर-ए-तैबा, डी-कंपनीच्या विरोधात भारत-अमेरिका यांनी एकत्र येऊन लढाई करण्यावरही सहमती दर्शवली आहे. त्यामुळे अडचणी वाढणार आहेत. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला रोखण्यासाठी नेतृत्वांत चर्चा झाली होती.  

दहशतवादाच्या विरोधातील लढाईत  पाक अग्रस्थानी : चीन
भारत-अमेरिकेतील दहशतवादविषयक चर्चेच्या पार्श्वभूमीवर चीनने पाकिस्तानची बाजू घेतली आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढाईत पाकिस्तान अग्रस्थानी आहे, असे चीनने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानला दहशतवादाच्या विरोधातील लढाईत मोठ्या पातळीवर मदत करण्याची गरज आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्री पदाचे प्रवक्ते लु कँग यांनी म्हटले आहे.  
बातम्या आणखी आहेत...