आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानाचे टायर फुटले; मंत्र्यांसह १५० बचावले, राजधानी काठमांडूतील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - नेपाळची राजधानी काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात टळला. नवी दिल्लीहून काठमांडूला पोहोचलेल्या नेपाळ एअरलाइन्सच्या विमानाचे एक टायर उतरताना फुटले. विमानात नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रकाश शरण महत यांच्यासह १५० प्रवासी होते. महत नवी दिल्लीत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन परतत होते. नेपाळ एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी दुपारी १२.५० वाजता झाला. नवी दिल्लीहून रवाना झालेले एअरबस ३२० चे टायर उतरताना डाव्या बाजूने फुटले होते.
बातम्या आणखी आहेत...