आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nepal Asks Foreign Rescue Teams To Return Home As Hope Of

नेपाळने परदेशी पथकांना परत पाठवले, मात्र भारताचे मदत कार्य सुरुच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळमध्ये सध्या विस्थापितांचे अन्न पाण्यासाठी बरेच हाल होत आहेत. कदाचित त्यामुळेच शक्य होईल तेवढी पाकिटे जमा करण्याचा या चिमुरड्याचा प्रयत्न असेल. - Divya Marathi
नेपाळमध्ये सध्या विस्थापितांचे अन्न पाण्यासाठी बरेच हाल होत आहेत. कदाचित त्यामुळेच शक्य होईल तेवढी पाकिटे जमा करण्याचा या चिमुरड्याचा प्रयत्न असेल.
काठमांडू/नवी दिल्ली - भूकंपामुळे उध्वस्त झालेल्या नेपाळने मदत कार्य करणाऱ्या सुमारे 34 देशांच्या पथकांना परत पाठवले आहे. त्याचवेळी भारताची पथके मदतकार्यात सहकार्य करत राहणार असल्याचे नेपाळने स्पष्ट केले आहे.
नेपाळचे राजदूत दीप कुमार उपाध्याय यांनी सोमवारी सांगितले की, ‘पुनर्वसन आणि मदतकार्यात भारताचे सहकार्य सुरुच राहणार आहे. आम्हाली जी काही गरज वाटेल ती आम्ही भारताकडून मिळवू. नेपाळने परदेशी पथकांना परतण्यास सांगितल्याने निर्माण झालेल्या संभ्रमानंतर उपाध्याय यांनी भारताचे परराष्ट्र सचिन एस. जयशंकर यांना भेटून हे स्पष्ट केले.

नाराजी नाही, नेपाळचे स्पष्टीकरण
नेपाळ सरकार भारतावर नाराज आहे का? असे नेपाळच्या राजदुतांना विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी तसे काही नसल्याचे स्पष्ट केले. सकारात्मक रहा, नकारात्मक नाही असे ते म्हणाले. भूकंपाच्या नऊ दिवसांनंतरही भूकंपाचे बचाव कार्य सुरू ठेवता येणार नाही. आता ते संपले असे मानायला हवे, असे ते म्हणाले. आता केवळ ढिगारे हटवण्याचे काम शिल्लक राहिले आहे. नेपाळ सरकार आणि लष्कराला आता केवळ उपकरणांची आवश्यकता आहे. भारताने आम्ही सांगितल्यानंतर अवघ्या सहा ते सात तासांत काठमंडूमध्ये सर्व उपकरणे उपलब्ध करून दिली, त्याबाबत त्यांनी भारताचे आभारही मानले. ढिगारे हटवल्यानंतर पुनर्वसनाचे काम हाती घेतेले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

एनडीआरएफची पथके परत बोलावणार भारत
गेल्या महिन्यात 25 तारखेला आलेल्या भूकंपानंतर मदतकार्यासाठी पोहोचलेल्या परदेशी पथकांना नेपाळने परत जाण्यास सांगितले आहे. नेपाळमध्ये भारतासह सुमारे 34 देशांचे सुमारे 4,050 विशेषज्ञ आणि 129 कुत्रे बचाव कार्यात जुंपले आहेत. सरकारच्या निर्णयानंतर यातील काही तज्ज्ञ परतले आहेत. या निर्णयानंतर नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले की, एनडीआरएफच्या पथकांना नेपाळहून परत बोलावण्यात आले आहे. पण त्याठिकाणी भारताचे मदतकार्य सुरुच राहील.

पुढील स्लाइड्सवर पाहा, नेपाळमधील सद्यस्थितीचे PHOTO