आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nepal Earthquak: 260 Missing, 17 Thousand Injured, Above 8 Thosuand Death

नेपाळमध्ये २६० बेपत्ता, जखमी १७ हजार, तर मृतांची संख्या ८ हजारांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - नेपाळमधील भूकंपग्रस्त भागात अद्यापही २६० जण बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा गुरुवारी ८ हजार ४१३ वर पोहोचला आहे.नेपाळ रेड क्रॉस सोसायटीने हा दावा केला आहे. जखमींची संख्या १७ हजार ५७६ असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. दुसरीकडे चीनने नेपाळच्या मदतीने लष्करी जवान रवाना केले . आतापर्यंत परदेशी भूमीवर एवढ्या मोठ्या संख्येने चिनी लष्कर पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याशिवाय चीनने नेपाळी भूकंपग्रस्तांसाठी ४१६ टन मदत साहित्य देखील रवाना केले आहे.

१९० प्रकारचे अभियांत्रिकी साहित्य देखील पाठवण्यात आल्याची माहिती चिनी सरकारकडून देण्यात आली आहे. हवाई मदत करताना देखील चीनने पुढाकार घेतला आहे. तीन हेलिकॉप्टर पाठवण्यात आले होते. त्यातून २ हजार ३८७ नागरिकांना सुरक्षितपणे काढण्यात आले आहे.