१०५ वर्षीय फांचू गाले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना टिपलेले छायाचित्र.
काठमांडू - नेपाळमधील प्रलयंकारी भूकंपानंतर मदत व बचाव कार्याला वेग आला असून उद्ध्वस्त इमारतींच्या ढिगा-या खाली अजूनही काही लोक जिवंत सापडत असल्याने बचाव कार्य अधिक वेगाने सुरू करण्यात आले आहे. रविवारी नुवाकोट जिल्ह्यातील एका गावात १०५ वर्षीय जख्खड इसम त्याच्या घराच्या ढिगा-या खालीच जिवंत सापडला. या वृद्धास हेलिकॉप्टरने तातडीने त्रिशुली जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. विशेष म्हणजे फांचू गाले नामक या वृद्धात किरकोळ जखमा झालेल्या आहेत.
दरम्यान, काठमांडूपासून सुमारे ७० किमी अंतरावर स्याऊली गावात तीन लोकांना ढिगा-या खालून जिवंत काढण्यात आले. यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. सात दिवसांनंतर या तिघांना काढण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी बचाव कार्याचे प्रमुख सूर्यप्रसाद उपाध्याय यांनी याबाबत ठोस काही सांगण्यास नकार दिला. हे तिघे जिवंत सापडल्याचे रविवारी सकाळी सांगण्यात आले होते.
सात दिवसांनंतर मदत
नेपाळमधील भूकंपानंतर मदत व बचाव पथके आता कुठे दुर्गम व खेडेगावांत पोहचत आहेत. म्हणूनच गावागावांतून काही जिवंत लोक ढिगा-यांखालून काढण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, एव्हरेस्टच्या मकालू बेस कॅॅम्प्वरही १२ गिर्यारोहकांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले. यात एका भारतीयाचाही समावेश आहे. या भागात अजूनही १०० गिर्यारोहकांचा थांगपत्ता लागलेला नाही. त्यांचा शोध घेतला जात असून यातील काही गिर्यारोहक निश्चितपणे सापडतील, अशी बचाव पथकांना आशा आहे.
पुढे वाचा, मोठ्या विमानांना बंदी