आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

48 PHOTO तून पाहा उद्ध्वस्त झालेल्या नेपाळची हृदय हेलावून टाकणारी परिस्थिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज नेपाळच्या भूकंपाला 4 दिवस पूर्ण झाले. मात्र अजूनही अनेक मृतदेह हे मातींच्या ढीगाराखालीच अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तर काही ठिकाणी अजूनही मदत मिळालेली नाही. त्यामध्ये पावसाने हजेरी लावल्याने मदत कार्यात अनेक विघ्न येत आहेत. मिळेल तो आपल्या परिने जेवढे शक्य आहे तेवढी मदत करत आहे. मृतांचा अकडा १० हजारांच्या जवळपास जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्वतःच्या डोळ्यासमोर अनेकांनी त्यांचे नातेवाईक गमावले, तर काहींची घरे उध्दवस्त झालीत. चार दिवसांनंतर या भूकंपातून बचावलेला प्रत्येक जण पुन्हा नव्याने जीवन सुरू करण्यासाठी धडपडतोय. तर काही जण आपल्या नातेवाईकांच्या मृतदेहांवर एकट्याने अंत्यसंस्कार करत आहेत. नेपाळमधील ही दृश्ये पाहून कोणालाही रडू फुटेल अशी आहेत.

पुढील स्लाईडवर पाहा, नेपाळचे सध्याचे भयावह स्वरूप दाखवणारे फोटोज...